अ-हेरनवरगांव येथे श्रीमद देवी भागवत रहस्य ग्रामगीता तत्त्वज्ञान रहस्य हरिनाम भागवत सप्ताह प्रवचन सुरू.
एस.के.24 तास
ब्रम्हपुरी : (अमरदीप लोखंडे) दिनांक,०४/०४/२३ हनुमान देवस्थान सेवा समिती विश्वस्त, अ-हेर नवरगांव च्या पुढाकाराने हनुमान जयंती उत्सव साजरी करण्याच्या उदात्त हेतूने दि. ०१/०४ ते ०७/०४/२३ या कालावधीपर्यंत प्रवचनकार सुश्री साध्वी दिलाशा मेघशाम ठलाल व संच कढोली जिल्हा गडचिरोली यांच्या अमृतवाणीने आवळगांव येथील तबलावादक श्री बंडू नरुले, श्री राजेश पेंदोरकर यांच्या संगीत साजाने आणि रममान, तल्लीन होऊन एकाग्रतेने प्रवचन ऐकणाऱ्या भाविक जनता जनार्दनांच्या उपस्थितीत दिनांक ०१/०४/ते०७/०४/२३ या कालावधीपर्यंत हनुमान देवस्थानच्या पटांगणावरती भागवत सप्ताह प्रवचनाचेआयोजन करण्यात आले आहे.
या भागवत प्रवचनाचाआस्वाद परिसरातील जास्तीत जास्त बहुसंख्य जनतेने घ्यावा असे आयोजन समितीचे अध्यक्ष श्री ब्रम्हदासजी सावजकर ,उपाध्यक्ष जयंद्र भागडकर, सचिव प्रभुजी कुथे, सहसचिव मोरेश्वर जीभकाटे, कोषाध्यक्ष देवानंद राऊत, संयोजक हरिभाऊ बेंद्रे यांनी केले आहे.