गावात बौद्धांचे एकही घर नसताना माळी समाजाने केली डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी.
एस.के.24 तास
ब्रम्हपुरी : (अमरदीप लोखंडे) दिनांक,१६/०४/२३ तालुक्यातील कोसंबी (खडसमारा) येथे बौद्ध समाजाचे एकही घर नसतांना तेथील माळी समाजाने पुढाकार घेऊन पहिल्यांदाच विश्वरत्न परमपूज्य डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांची१३२ वी जयंती मोठ्या उत्साहाने साजरी केली आणि गावामध्ये नवीन पाया रचुन बाबासाहेबांबद्दल ची माहिती गावा सभोवताल पटवून देण्याचा आणि येणाऱ्या बौद्ध धर्माच्या जयंत्या भविष्यातही साजऱ्या करण्याचा त्यांनी संकल्प केला आहे.
आज पर्यंत आम्ही देवपूजनाच्या मागे लागलो परंतु देव काही आम्हाला भेटला नाही. परंतु खरे देव आम्हाला महात्मा ज्योतिबा फुले, रयतेची राजे छत्रपती शिवाजी महाराज, परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यात तो दिसायला लागला असे श्री वामनरावजी महुरले यांनी आपल्या प्रास्ताविक भाषणातून बोलून दाखविले.
आज आम्ही बाबासाहेब शिक्षणातून शोधत आहोत आणि शोधता शोधता एक दिवस ते आम्हाला मिळतीलच या अपेक्षेने जयंती साजरी करीत आहोत असे गावचे पोलीस पाटील यांनी आपल्या मनोगतातुन भावना व्यक्त केल्या.. .आम्ही सगळे एकच आहोत आणि बाबासाहेब हे सर्वांचेच आहेत कुण्या एका समाजाचे नाही हे त्यांनी अख्ख्या राज्याला दाखवून दिले.
सौ.संगीता जेंगठे सरपंचा ग्रामपंचायत ,कोसंबी (खडसमारा) यांच्या अध्यक्षतेखाली संजयजी गेडाम पोलीस पाटील, वामन मोहुर्ले, गिरीधर ठाकरे मारोती जेंगठे, कवडू मोहुर्ले, यांनी परमपूज्य गावातील प्रतिष्ठित नागरिक व गावकऱ्यांनी तथागत भगवान गौतम बुद्ध, परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेसमृद्धी प्रज्वलन करून व पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
या कार्यक्रमाला गावातील बहुसंख्य स्त्री - पुरुष , नवतरुण, तरुणी उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री कवळु मोहुर्ले यांनी तर आभार देविका मोहुर्ले सामाजिक कार्यकर्त्या यांनी उपस्थितांचे मानले.