अवैध गोवंश करणाऱ्या आयशर ट्रक जप्त. ★ सावली पोलिसांची मोठी कारवाई.

अवैध गोवंश करणाऱ्या आयशर ट्रक जप्त.


★ सावली पोलिसांची मोठी कारवाई.


चंद्रकांत प्रधाने!तालुका.प्रतिनिधी!सावली


सावली : अवैध गोवंश जनावरांची वाहतुक होत असल्याची गुप्त माहिती नुसार दिनांक, ०८/०४/२०२३ रोजी रात्री ०१:०० वाजताच्या सुमारास मुल दिशेकडून गोंडपिंपरी जाणाऱ्या मार्गावर खेडी फाटा येथे नाकाबंदी करून मुल कडून येणाऱ्या कंटेनर आयशर ट्रक क्रं TS 12 UD 2780 थांबवले असता चालक पोलिसांना पाहून वाहन सोडून पळून गेला. 



सदर ट्रक कंटेनर पाहणी केली असता कंटेनरमध्ये एकूण ३६ गोवंश जातीचे जनावरे अत्यंत निर्दयतेने बांधलेल्या अवस्थेत दिसून आले. मिळून आलेले एकूण ३६ गोवंश जनावरे किंमत ०३ लाख ६० हजार रुपये व नमूद क्रमांकाचा आयशर ट्रक किंमत अंदाजे १० लाख रुपये असा एकूण किंमत १३लाख ६० हजार रुपये चा मुद्देमाल जप्त करण्यात आला.जप्त गोवंश जनावरे ही गोशाळेत दाखल करण्यात आले आहेत.


आरोपीविरुद्ध संबंधित कायद्यान्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. सदरची कारवाई पोलिस अधीक्षक श्री रवींद्र सिंग परदेशी साहेब,अप्पर पोलिस अधीक्षक रिना जनबंधू यांचे मार्गदर्शनाखाली ठाणेदार श्री,आशिष बोरकर यांचे नेतृत्वात हवालदार दर्शन लाटकर,विशाल दुर्योधन,मोहन दासरवर यांनी केली.


 गोवंश तस्करी करण्याकरिता तस्कर नवीन नवीन शकले लढवून तस्करी करण्याचा प्रयत्न करीत आहेत.पोलिस स्टेशन सावली कडून अवैध गोवंश जनावरे तस्करीवर सतत प्रभावी कारवाया करण्यात येत असून भविष्यातही प्रभावी कारवाया करण्यात येतील. - ठाणेदार श्री,आशिष बोरकर

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !