धानात पांढरी लोंबी निसवीत असल्याने धान उतारीत घटीची शक्यता. ★ निसर्गाचा कोप,शेतकरी देशोधडीला.

धानात पांढरी लोंबी निसवीत असल्याने धान उतारीत घटीची शक्यता.


★  निसर्गाचा कोप,शेतकरी देशोधडीला.


नरेंद्र मेश्राम!जिल्हा प्रतिनिधी!भंडारा


भंडारा : निसर्गाच्या लहरीपणाचा फटका मागिल काही वर्षांपासून शेतकऱ्यांना बसत आहे. त्या संकटाचा वारंवार सामना करीत असला तरी मात्र निस र्गाचे संकटावरसंकट येत असल्याने शेतकरी पार देशोधडीला लागला आहे.


लाखांदूर तालुक्यातील बारव्हा परिसरात इटीया डोह शिंचनासह बोअरवेलचे अनेक शेतकऱ्यांच्या शेतात पाण्याची सोय आहे. त्यामुळे बारव्हा परिसरात मोठया प्रमाणात धान पिकाची लागवड करण्यात येते. यावर्षी इटीयाडोह धरणात मोठया प्रमाणात पाणीसाठा उपलब्ध असल्याने बारव्हा परिसरात रब्बी हंगामात मोठया प्रमाणात धान पिकाची लागवड करण्यात आली आहे. यावर्षी वातावरणाच्या बदलामुळे परे पेरणी पासून तर रोवणी पर्यंत व रोवणी पासून तर धान निसावा होईपर्यंत विविध संकटाचा सामना शेतकऱ्यांना करावा लागला आहे. 


यात विविध प्रकारची धान पिकावर रोगराई,या रोगराईला आटोक्यात आणन्यासाठी शेतकऱ्यांनी महागडी कीटकनासक औषधाची दुबार तिबार फवारणी करून रोगराई आटोक्यात आणली. सध्या स्थितीत धान पीक निसविन्याच्या तारणेत असतांना मागिल काही दिवसापासून अवकाळी पाऊस व गारपीटीचा फटका व वातावरण बदलाचा परिणाम धानपिकावर होत आहे. वारंवार संकटावर संकट येत आहेत. त्याचा सामना करीत असताना आता धानाच्या लोबी ऐवजी पांढरी धानाची लोबीच निसविताना दिसत आहे. 


या पांढऱ्या धानाच्या लोम्बीला ग्रामीण भाषेत पेरवा म्हणतात. धानाची लोम्बी कमी व पांढरा पेरवा जास्त निघत असल्याने यावर्षी शेतकऱ्यांच्या उत्पनात कमालीची घट येण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतात लावलेली पुंजीही निघेल याची शास्वती नाही. पुन्हा एकदा शेतकरी कर्जाच्या खाईत ओढवला जात आहे. परिणामी चिंताग्रस्त जीवन जगण्याची पाळी शेतकऱ्यांवर आल्याची दिसून येत आहे.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !