ट्रॅक्टरला बांधून युवकास मारहाण करताना चा व्हिडिओ वायरल.
★ ब्रम्हपुरी जवळील बेलगाव येथील घटना.
★ अमानुषतेचे कळस मन हेलावणारी घटना.
★ एक माजी जि.प.सदस्य,ग्राम पंचायत सदस्य असल्याची चर्चा आहे.
एस.के.24 तास
ब्रम्हपुरी : (अमरदीप लोखंडे) दिनांक,०३/०४/२३ एका व्यक्तीला ट्रॅक्टरला बांधून तीन व्यक्ती बेदम मारहाण करीत असल्याचा व्हिडीओ सोशल मिडीयावर नुकताच व्हायरल झाला आहे. या घटनेचा सोशल मिडीयावर चांगलाच संताप व्यक्त केल्या जात आहे.सोशल मिडीयावर व्हायरल झालेल्या घटनेबाबत ब्रम्हपूरी पोलिस काय कारवाई करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
सोमवारी सोशल मिडीयावर भगवान महादेव जगदाळे वय,35 वर्षे श्रींगारवाडी जिल्हा बीड या जेसीबी चालकाला ट्रॅक्टरला बांधून तीन व्यक्ती हाताने,बेल्टने बेदम मारहाण करीत असतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला.
कारण होते तू माझ्या पत्नीकडे का पाहिलास म्हणून...!
सोशल मिडीयावर मारहाणीचा व्हिडीओ व्हायरल होताच एकच खळबळ उडाली.जो व्हिडीओ व्हायरल झाला त्यामध्ये सदर तरूणाला ट्रॅक्टरला बांधण्यात आले आहे.त्याला हाताने,बेल्टने मारहाण केल्याचे दिसून येत असुन एका व्यक्तीच्या हातात कोयता असुन कोयत्याने सदर तरुणाला जीवेनीशि व पेटवून मारण्याचा प्रयत्न तर नाही ना ? असा प्रश्न जनतेला पडला आहे.
हातात पेट्रोल अथवा डिझेलची छोटी कॅन दिसून येत आहे.त्या जेसीबी मजूरा सोबत होणारा प्रकार भयावह आहे.जे व्यक्ती मारहाण करीत आहेत,त्यामध्ये एक माजी जि.प.सदस्य,ग्राम पंचातय सदस्य असल्याची चर्चा आहे.ज्या व्यक्तीला मारहाण करण्यात येत आहे. तो व्यक्ती जेसीबी चालक मजूर असून बीड जिल्ह्यातील आहे.
पाणी पुरवठा योजनेचे काम करण्याकरीता बेलगाव या गावी आला असल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणी सदर मारहाण करणाऱ्याआरोपी विरुद्ध कलम २९४,३४९,५०६,३४,३५२,३२३
आरोपी : - दिनेश काशिनाथ अवसरे ,नीलेश काशिनाथ अवसरे,गणेश काशिनाथ अवसरे यांचेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास ब्रम्हपुरी पोलीस करत आहे.