ब्रम्हपुरी येथे संपन्न झाले मती समृद्धता आंदोलन. - कवि संमेलन.
एस.के.24 तास
ब्रम्हपुरी : (अमरदीप लोखंडे) दिनांक,२५/०४/२३ चक्रवर्ती सम्राट अशोक यांच्या २३व्या जन्मशताब्दी समारोह निमित्त पे बॅक टू दी सोसायटी, प्रोग्राम ब्रम्हपुरी अंतर्गत बुद्धिजीवी वर्ग निर्माण कार्यशाळा व मती समृद्धता आंदोलन कविसंमेलन नुकतेच रविवार दिनांक २३ एप्रिल २०२३ ला संत गाडगेबाबा सभागृह, पंचायत समिती , ब्रम्हपुरी येथे संपन्न झाले.या कवी संमेलनाचे अध्यक्ष धीमंत गीता विश्वकर्मा कोरबा ( छत्तीसगढ) ह्या होत्या. कविसंमेलनाचे बहारदार सुत्रसंचलन प्रसिद्ध कवी भिमानंद मेश्राम ब्रम्हपुरी यांनी केले.
या कविसंमेलनात डॉ.मंजुषा साखरकर,अमरदीप लोखंडे,अशोक शामकुळे,संजय भैसारे,गौतम राऊत, देवेंद्र निकुरे,सुकेशिनी बोरकर,वर्षा चौधरी इत्यादी कवी कवीयत्रींनी सामाजिक आशयाच्या उत्कृष्ट कविता सादर करुन उपस्थितांची मने जिंकली व वातावरण भारावून टाकले.