खासदार,अशोक नेते थेट शेतकऱ्यांच्या बांधावर.

खासदार,अशोक नेते थेट शेतकऱ्यांच्या बांधावर.


★ वादळी वाऱ्यासह अकाली पावसामुळे अमिर्झा व मुरूमबोडी या परिसरात नुकसान झालेल्या मक्का या पिकांची पाहणी करतांना खासदार अशोक नेते.


एस.के.24 तास


गडचिरोली : गडचिरोली जिल्हातील अमिर्झा व मुरूमबोडी या परिसरात मागील चार आठ  दिवसांपासून सततच्या वादळी वाऱ्यासह अकाली पावसामुळे कहर केलेला असून यामध्ये  शेतकऱ्यांचा फार मोठया प्रमाणात शेत पिकांचा नुकसान झालेला आहे.परिसरातील शेतकऱ्यांनी दुय्यम पीक म्हणून मक्का या पिकाची लागवड केलेली होती. परंतु शेवटच्या क्षणी हातावर आलेल्या मक्का या पिकांचे अवकाळी वादळी वाऱ्यासह पावसाने मक्का या पिकांचे निस्तानाभूत करून फार मोठ्या प्रमाणात  नुकसान  केले आहे. त्याची पाहणी करण्याकरिता खासदार अशोक नेते यांनी थेट शेतकऱ्यांच्या  बांधावर जाऊन पाहणी केली.


शेतकऱ्यांचा हातात पिक येत नाही त्यावेळी शेतकऱ्यांच्या पिकांची राखरांगोळी रानटी डुकर सुद्धा पिकांचा हैदोस करून पिक नष्ट करतात. तर एकीकडे वाघाची दहशत वाघाच्या भीतीने सुद्धा पिकांकडे दुर्लक्ष  होतो.अशातच  निसर्ग सुद्धा शेतकऱ्यांवर कोपुन अशातच  अवकाळी वादळ वाऱ्यांसह पावसाने शेतकऱ्यांच पीक नष्ट करून टाकला. अशा परिस्थितीत शेत झालेल्या अवकाळी वादळी वाऱ्याच्या पावसामुळे पिकांची नुकसान भरपाई देण्याची मागणी  करण्यात आली.


तसेच  याप्रसंगी अधिकारी वर्गांना सुध्दा यासंबंधीत पिकांची पंचनामे करून, पंचनाम्यात हायगय न करता किंवा दुधाभाव न करता ज्या शेतकऱ्यांनी मक्का पिकांची लागवड केली आहे.अशाच पीकांचा योग्य पंचनामा करून तात्काळ शासनास पाठवावे.असे निर्देश याप्रसंगी अधिकाऱ्यांना दिले. 


त्यावेळी खासदार तथा राष्ट्रीय महामंत्री भाजपा अनु.जनजाती मोर्चाचे अशोक नेते,जिल्हा महामंत्री प्रशांतजी वाघरे,विज्ञान कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य कऱ्हाडे सर,प्रकल्प संचालक (आत्म्याचे) डाखोरे साहेब, देविदास नागरे,तसेच परिसरातील मोठ्या संख्येने शेतकरी वर्ग उपस्थित होते.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !