राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले जयंती उत्साहात साजरी.
नरेंद्र मेश्राम!जिल्हा प्रतिनिधी!भंडारा
भंडारा : सामाजिक क्रांतीचे अग्रदूत राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले यांची 196 वी जयंती भंडारा जिल्ह्यातील विविध सामाजिक संघटना च्या वतीने भंडारा येथे साजरी करण्यात आली,
केस कापणे हा नाव्ह्याचा धर्म नाही धंदा आहे, चामाड्यांना शिवणे हा चांभाराचा धर्म नाही धंदा आहे तसेच पूजा पाठ करणे हा ब्राम्हणांचा धर्म नसून धंदाच आहे.
"क्रांती साठी प्रत्येकाला लढायला लागते, ते आपले वडील असो, भाऊ असो, शेजारील कोणी असो, किंवा शत्रू असो, संघर्षाशिवाय कोणी जिंकले नाही आणि जिंकणार सुद्धा नाही."
*विद्ये विना मती गेली।
मती विना निती गेली॥
निती विना गती गेली।
गती विना वित्त गेले॥
वित्ता विना शुद्र खचले।
एवढे अनर्थ एका अविद्येने केले॥
सत्यशोधक मार्ग अवलंबून समाज परिवर्तन घडवून आणण्यासाठी प्रयत्न करणारे राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले यांची 196 वी जयंती अचल मेश्राम अध्यक्ष सामाजिक न्याय संघटना भंडारा यांच्या अध्यक्षतेखाली तर डॉ.देवानंद नंदागवळी प्रदेश अध्यक्ष केंद्रीय मानवाधिकार संघटना नवी दिल्ली,नाशिक चौरे अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद अध्यक्ष भंडारा,सुर्यभानजी हुमने प्रदेश सचिव कास्ट्राईब संघटना महाराष्ट्र राज्य, डाॅ.रतनकुमार गेडाम साहेब बुद्ध विहार समन्वय समिती ज्येष्ठ मार्गदर्शक भंडारा, हरिश्चंद्रजी धांडेकर जिल्हा सचिव कास्ट संघटना भंडारा, ज्ञानेश्वर गजभिये से नि मॅनेजर ग्रामीण बँक,लोकशाहीर अंबादास नागदेवे, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ता यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम साजरा करण्यात आला, राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांना भारतरत्न या सर्वोच्च पुरस्काराने सरकारने सन्मानित करून फुले दांपत्यांचे यथोचित सन्मान करण्यात यावा.
असे अध्यक्षीय भाषणातून सांगण्यात आले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन युवा सामाजिक कार्यकर्ता जयेंद्र गुलाब देशपांडे यांनी केले तर आभार प्रदर्शन रोशन जांभुळकर यांनी मानले. कार्यक्रमाप्रसंगी चंदन राऊत,भजनदास मेश्राम, भागवत मेश्राम, सत्यवान मेश्राम,आर डी रामटेके, सिद्धार्थ बन्सोड,राष्ट्रपालजी नाईक, महेंद्र मानकर भिवगडे या सामाजिक कार्यकर्त्यासह परिसरातील बहुसंख्येने सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.