हेडरी येथे त्रिशरण फाउंडेशन पुणेच्या वतीने शिलाई मशिन चे एक दिवसीय कार्यशाळा.
एस.के.24 तास
एटापल्ली : लायड्स मेटल प्रा. लि. सुर्जागड यांचे वतीने हेडरी येथे चालू असलेल्या शिलाई मशीन प्रशिक्षणात त्रिशरण फाउंडेशन पुणे शाखा एटापल्ली च्या वतीने एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करीत . त्रिशरण फाउंडेशन पुणे च्या व्यवस्थापिका प्रज्ञा वाघमारे मॅडम यांनी शिलाई मशीन प्रशिक्षणात मध्ये उपस्थित असलेले.महिलांना डिजाइन,फॅशन,या बद्दल माहिती देत या प्रशिक्षणातून चांगले धडे घेत एक रोजगार उपलब्ध करण्याची संधी आपल्याला मिळाली असून ती आपण प्रामाणिकपणाने पार पाडली पाहिजे
व येणाऱ्या पुढील काळात आपण आपल्या कुटुंबाचा मजबुत खांब आपण बनली पाहिजे... व कुटुंबाची जबाबदारी चा मोठ्ठा हिस्सा आपण बनल पाहिजे. तेव्हा क्लास मध्ये सहभागी झाल्या नंतर मिळणारी माहिती लक्षपूर्वक घेतली पाहिजे. घरी असल्या नंतर घरच्या कामात जसे लक्ष असत तसेच आपन कार्य शाळेत आल्यानंतर आपल पुर्ण मन शिलाई मशीन मध्ये असणे गरजेचे आहे.
इथे मिळणार प्रशिक्षण तुम्हाला सोन्याची संधी उपलब्ध करून देणार एक क्षण, काळ, वेळ आहे ती वाया जावू देवु नका त्या संधी चे सोन करा व तुम्हाला प्रशिक्षण प्रशिक्षण पूर्ण करून सक्षम बना. या कार्यक्रमाला जिल्हा समन्वयक मंगल सर यांच्या आदेशाने संस्थेचे स्वयंसेवक निशा शुक्ला, विनोद पदा उपास्थित होते.