स्वतंत्र मजदुर युनियन लढा तीव्र करणे काळाची गरज - डी.एम.खैरे

स्वतंत्र मजदुर युनियन लढा तीव्र करणे काळाची गरज - डी.एम.खैरे


नरेंद्र मेश्राम!जिल्हा प्रतिनिधी!भंडारा


भंडारा : नजीकच्या गणेशपुर ग्रामपंचायत येथे स्वतंत्र मजदुर युनियन मार्फत विविध विभागातील कार्यरत कर्मचारी, मजदुर,श्रमिक यांनी न्याय हक्कासाठी लढा देण्याची नितांत आवश्यकता असल्याने संघटीत लढा तीव्र करण्याची गरज असल्याचे विधान  डी.एम. खैरे यांनी व्यक्त केले.

दिनांक 9 एप्रिल 2023 ला  गणेशपुर ग्रामपंचायत हॉल  भंडारा येथे दुपारी 3:30 वाजता स्वतंत्र मजदुर युनियन चे राष्ट्रीय उपाध्यक्ष  एन. बी. जारोंडे या  सभेच्या अध्यक्ष स्थानीं होते.ते म्हणाले की,स्वतंत्र मजदुर युनियन संघ  हे सर्व स्तरावरील कार्यरत जनतेचे न्याय, हक्क लढाई चे व्यासपीठ आहे, खाजगीकरणाच्या जाळ्यातून  सुरक्षा हवी असेल तर सर्व कामगार, श्रमिक, कर्मचारी यांनी स्वतंत्र मजदुर युनियन सोबत लढ्ढा दिला पाहिजे असे प्रतिपादन केले.

  

या वेळीं प्रमुख पाहूणे म्हणून स्वतंत्र मजदुर युनियन  चे  महासचिव डी. एम.खैरे महाराष्ट्र प्रदेश, संघटन सचिव गणेश उके स्वतंत्र मजदुर युनियन महाराष्ट्र प्रदेश, स्वतंत्र पोस्टल अध्यक्ष दिनेश बोरकर केंद्रीय महाराष्ट्र.  राज्य मागासवर्गीय विद्युत कर्मचारी स घटनेचे केंद्रीय उपाध्यक्ष सी.एस. जनबदकर महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक असोसिएशन राज्य सरचिटणीस श्यामराव नागदेवे यांनी  स्वतंत्र मजदुर युनियन चे कार्य हे शाहू ,फुले, आंबेडकर विचारधारेवर कार्य करणारी  राष्ट्रीय पातळीवर एकमेव संघटना कार्यरत असून सर्व आरक्षित प्रवर्गातील वर्ग चार कर्मचारी तेवर्ग एक अधिकारी संघटीत शेतकरी वअसंघटित कामगार यांनी  संघटीत पणें सभासद नोंदणी करावे असे आवाहन केले. जिल्हापरिषद माध्यमिक अधीक्षक मनीष वाहाने यांनी स्वतंत्र मजदुर युनियन संघटना जिल्हा जिल्हास्तरावर पुढे वाढविणार असल्याची हमी दिली. या सभेमध्ये पदोन्नती मधील आरक्षणाची सद्यस्थिती , नवीन पेन्शन योजना, जुनी पेन्शन योजना, संघटित आणि असंघटित क्षेत्रातील कामगार कायदे, या विषयांवर  विस्तृत चर्चा घडवून आणले. 


   या सभेमध्ये स्वतंत्र मजदुर युनियन शाखा भंडारा जिल्हा शाखेची कार्यकारिणीची निवड करण्यात आली. यात जिल्हा अध्यक्ष म्हणून ग्रामविकास अधिकारी श्यामराव नागदेवे,यांची निवड करण्यात आली तर सचिव म्हणून जिल्हा परिषद शिक्षण विभाग माध्यमिक चे अधीक्षक मनीष वाहाने यांची  बहुमताने निवड करण्यात आली उपाध्यक्ष  पदी संजय केवट ,सिद्धार्थ गजभिये, संजय बागडे ,सहसचिव सुरेश खोब्रागडे, संघटन सचिव म्हणून टेकदास अंबादे, पौर्णिमा साखरे, प्रदीप तायडे कोषाध्यक्ष म्हणून मिलिंद जनबंधू कार्यकारणी सदस्य मनीष कोटांगडे, युवराज पौनीकर, के जी कन्नाके, विनोद  किंदरले, मयूर वाघाये, प्रवीण गजभिये, रोशन वंजारी . सभेचे  संचालन सी एस जनबदकर यांनी केले. तर लाखनी   पंचायत समिती  चे ग्रामविकास अधिकारी लालचंद मेश्राम यांनी सर्वांचे आभार मानले.

या सभेमध्ये भंडारा जिल्ह्यातील   महावितरण, महापारेशन,पाटबंधारे विभाग,पंचायत समिती, जिल्हापरिषद, जिल्हाधिकारी कार्यालय, तहसील कार्यालय,पोस्ट ऑफीस, आरोग्य विभाग,शिक्षण विभाग,पाणीपुरवठा विभाग,,कंत्राटी कामगार, सामाजिक कार्यकर्ते, नगरपरिषद , शिक्षण विभाग इत्यादी विभागांमधील अधिकारी , कर्मचारी व कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !