वैनगंगा पतसंस्थेच्या अध्यक्षपदी विजय कोरेवार यांची निवड.
सुरेश कन्नमवार!मुख्य संपादक
सावली : वैनगंगा नागरी सहकारी पतसंस्था सावलीची नवनिर्वाचित संचालकांमधून अध्यक्ष, उपाध्यक्ष पदाची निवडणूक सहाय्यक सहकारी निबंधक तथा अध्यासी अधिकारी एन. एम. बाजड यांचे अध्यक्षतेखाली पदाधिकारी निवडीची सभा घेण्यात आली. या सभेत विजय गुड्डी कोरेवार यांची बिनविरोध अध्यक्षपदी तर विलास त्र्यंबक यासलवार यांची उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली.यावेळी संचालक आशिष मनबतुलवार,आशिष पुण्यपवार, दिवाकर काचीनवार, सचिन संगीडवार, अनिल माचेवार, धनराज कुरेकार,मल्लाजी आरेवार,अंशुताई दुवावार, सल्लागार संतोष आकुलवार उपस्थित होते. विजय कोरेवार यांची दुसऱ्यांदा अध्यक्षपदी निवड झाली तर संपूर्ण संस्थेची निवडणूक बिनविरोध झाली.यावेळी व्यवस्थापक नरेंद्र राचेवार,रोशन सिंगरेवार,जयाप्रदा आकुलवार यांनी सर्वांचे अभिनन्दन केले.