शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आय.टी.आय.) येथे छत्रपती शाहू महाराज युवाशक्ती करिअर शिबीराचे आयोजन.

शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आय.टी.आय.) येथे छत्रपती शाहू महाराज युवाशक्ती करिअर शिबीराचे आयोजन.


एस.के.24 तास


गडचिरोली : व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय, म.रा.मुंबई यांचे निर्देशानुसार शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आय.टी.आय.) गडचिरोली व जिल्हा कौशल्य् विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र,गडचिरोली यांच्या संयुक्त विद्यमाने येत्या ५ मे  रोजी सकाळी १०  वाजता छत्रपती शाहू महाराज युवाशक्ती करिअर शिबीराचे आयोजन करण्यात आलेले आहे.


सदर शिबीरामध्ये १० वी व १२ वी नंतर काय? भविष्यातील शिक्षणाच्या तसेच रोजगारांच्या व स्वयंरोजगाराच्या संधी, व्यक्तीमत्त्व  विकास, बायोडाटा तयार करणे, मुलाखतीची तयारी , नविन तंत्रज्ञानावर आधारित प्रशिक्षण व रोजगाराच्या संधी इत्यादी बाबत सविस्तर मार्गदर्शन तज्ञ मार्गदर्शकांकडून  करण्यात येणार आहे. तसेच रोजगार व स्वयंरोजगारासाठी, शैक्षणिक कर्ज उपलब्ध करून देणाऱ्या बँक व वित्तीय संस्थांचे प्रमुख प्रतिनिधी  उपस्थित राहुन   मार्गदर्शन करण्यात येणार आहे.


तरी गडचिरोली जिल्हयातील सर्व विद्यार्थी व पालक यांनी छत्रपती शाहू महाराज  युवाशक्ती करिअर शिबीरामध्ये सहभागी होवून या सुवर्णसंधीचा लाभ घेण्याचे आवाहन औद्योगिक प्रशिक्षण संस्था, गडचिरोलीचे प्राचार्य श्री.संतोष साळुंके यांनी   केले आहे.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !