श्री.संताजी महाविद्यालयात स्पर्धा परीक्षा कार्यशाळा आयोजन.
नरेंद्र मेश्राम
भंडारा : श्री संताजी कला व विज्ञान महाविद्यालय पालांदूर येथे सांस्कृतिक विभागाच्या वतीने स्पर्धा परीक्षे बद्दलचे मार्गदर्शन या विषयावर कार्यशाळा घेण्यात आली या कार्यशाळेचे अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ.गिरीश लांजेवार हे होते तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून डॉ.क्षितीज बर्वे, पुणे आणि संदीप वाघमारे युनिक अकॅडमी, नागपूर यांची उपस्थिती होती डॉ. रवी पाटेकर डॉ. राजेंद्र खंडाईत डॉ. रमेश बागडे यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि मार्गदर्शनात ही कार्यशाळा घेण्यात आली स्पर्धा परीक्षेला सामोरे जाताना कोणत्या अडचणी विद्यार्थ्यांसमोर असतात त्यांचे निरसण कसे करता येईल याकरिता विद्यार्थ्यांना कोणते कार्य करावे लागणार या संदर्भात या कार्यशाळेतून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.
या कार्यशाळेचे आयोजन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रदीप दहिकर यांच्या मार्गदर्शनात करण्यात आले होते .सूत्रसंचालन तथा प्रास्ताविक डॉ संजयकुमार निंबेकर यांनी केले तर आभार प्रा. नितीन थूल यांनी केले सदर कार्यशाळेत प्रा. प्रमोद शेंडे, मनोज मोहतुरे ,रेश्मा खंडाईत या प्राध्यापक मंडळी सोबतच महाविद्यालयातील बहुसंख्या विद्यार्थी उपस्थित होते.