चिचाळ वाशियांचे लाखांदूर तहसील समोरील उपोषण तूतार्स मागे.
★ तहसीलदार व नायब तहसीलदार संपावर गेल्याने उपोषण मागे.
★ प्रकरण चिचाळ येथिल शासकीय अतिक्रमण जागेचे.
नरेंद्र मेश्राम!जिल्हा प्रतिनिधी!भंडारा
भंडारा : शासकीय जागेवर अतिक्रमण करणे व ती जागा बाहेर गावातील व्यक्तींना साध्या नोटरीवर लाखो रुपयात विकणे. तसेच ती विकलेली जागा ग्रामपंचायत चिचाळ येथील पदाधिकारी हे बाहेर गावातील व्यक्तींनी घेतलेली जागेची काही आर्थिक व्यवहार करून गाव नमुना आठ अ ला नोंद घेतात. अशा प्रकारे गैरव्यवहार करणाऱ्या ग्रामपंचायत पदाधिकारी व भूखंड विकणाऱ्या व घेणाऱ्यावर कार्यवाही करावी.
यासह अन्य मागण्या घेऊन दि.3 एप्रिल रोजी सकाळी 11वाजता. उपोषनावर बसण्याचा इशारा उपोसन कर्ते अविनाश सोनपिंपळे व राजन वासनिक सह अन्य ग्रामस्थांनी प्रशासनाला दिला होता.त्यानुसार या उपोषणास सुरवातही करण्यात आली.मात्र दि.3 एप्रिल पासून तहसीलदार व नायब तहसीलदार हे संपावर गेल्याने होणारे लाखांदूर तहसील कार्यालय समोरील उपोषण हे तुतार्स मागे घेण्यात आल्याची माहिती उपोषण कर्त्यांनी निवेदनातून दिली आहे.
लाखांदूर तालुक्यातील चिचाळ टी पाईट येथील रस्त्याच्या कडेला असलेल्या शासकीय जागेवर गावातील काही नागरिकांनी अतिक्रमण केले आहे. मात्र तिथे कोणत्याही प्रकारचे घराचे बांधकाम करण्यात आले नाही. तरी खुली असलेल्या जागेवर ग्रामपंचायत प्रशासनाने ती जागा गाव नमुना आठ वर चढविण्यात आली आहे. खुली पकडलेली जागा ही स्वतःच्या मालकीची म्हणून इतर गावातील लोकांना लाखों लाखों रुपयाला विकत आहेत.
असे होऊ नये. त्यांच्यावर कार्यवाही व्हावी. म्हणून ग्रामस्थांनी 3 एप्रिल ला उपोषणावर बसण्याचा इशारा निवेदनातून तहसीलदार यांना दिला होता.या निवेदनात चिचाळ /को. ग्रामपंचायत कार्यालय अंतर्गत गट क्र.24,25,26,395,385,383,384,363, वरील विक्री पत्र, बक्षीसपत्र गाव नमुना आठ अ रद्द करण्यात यावे. शासकीय जागेची खरेदी विक्री करणाऱ्या व्यक्तीची सखोल चौकशी करून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा.
शासन प्रशासनाच्या आधीपत्यात असलेले नियम आधारित बाजूला सारून प्रशासनाने विक्रीचा धंदा सुरु करून अतिक्रमण केलेले व विक्री दिलेली जागा रिक्त करण्यात यावे. शासकीय विक्री करणाऱ्या ग्रामपंचायत पदाधिकारीवर कार्यवाही करण्यात यावी. यासाह अन्य मागण्या घेऊन हे उपोषण करण्यात येणार होते. त्यानुसार दि.3 एप्रिल रोजी ठरल्याप्रमाणे लाखांदूर तहसील कार्यालयासमोर उपोसनाला सुरवात करण्यातही आली. मात्र तहसीलदार व नायब तहसीलदार हे आपल्या मागण्यासाठी संपावर गेले असल्याने उपोषण कर्त्यांनी तात्पुरते उपोषण आंदोलन मागे घेतले असल्याचे निवेदत म्हटले आहे.
यावेळी उपोषणकर्ते अविनाश सोनपिंपळे, राजन वासनिक, विजय वासनिक, बेबीनंदा वासनिक, मंगला वासनिक, बेबी नदागवळी, बिबिनंद सरादे, शारदा रंगारी, शशिका रंगारी, कौसल्या रामटेके, नाजूक शेंडे, मंदालाल वासनिक, आशिष वासनिक, मंदा उके, मनोरंमा मेश्राम, आदिनाथ नदगवळी, निशा उके, मालता सोनवणे,यासह मोठ्या संख्यने महिला व पुरुष ग्रामस्थ या दरम्यान उपस्थित होते.