वाघाच्या हल्ल्यात महिला ठार.

 


वाघाच्या हल्ल्यात महिला ठार.


सुरेश कन्नमवार!मुख्य संपादक


सावली : पासून १५ किलोमीटर अंतरावर असलेल्या वाघोली बुट्टी येथील ममता हरिश्चंद्र बोदलकर वय,६५वर्ष ही महिला आपल्या शेतात काम करण्यासाठी गेली असता दबा धरून बसलेल्या वाघाने हल्ला करून तिला जागीच ठार केल्याची घटना घडली.सदर घटनेची माहिती मिळताच गावकऱ्यांनी घटनास्थळी गर्दी केली.महिलेला ठार केल्यानंतर वाघाने जवळच आपला दबा धरून ठेवला व अर्ध्या तासातच गर्दीतल्या लोकांच्या अंगावर आल्याने त्या लोकांपैकी गोवर्धन नामक व्यक्तीच्या पायाला जबर दुखापत झाली.

सावली वनपरिक्षेत्र अतिशय संवेदनशील क्षेत्र असून या परिसरात वाघ व बिबट यांचा वावर मोठ्या प्रमाणात आहे त्यामुळे जनमानसात वनविभागाबाबत प्रचंड आक्रोश निर्माण होत आहे. आजपर्यंत चंद्रपूर जिल्ह्यात वाघाच्या हल्ल्यात एकूण ५४ बळी गेलेले आहेत, त्यापैकी सावली तालुक्यातील हा २१ वा बळी असून चंद्रपूर जिल्ह्याचा विचार करता एक तृतीयांश पेक्षा जास्त बळी एका सावली तालुक्यात गेलेले आहेत, ही गांभीर्याची बाब आहे मात्र याकडे शासनाचे दुर्लक्ष होत आहे.



#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !