सुशिक्षित बेरोजगार आँटो चालकांच्या हातून शासनाने रोजगार हिरावला. - ऑटो चालक,देवराव पाटेवार
सुरेश कन्नमवार!मुख्य संपादक
मुल : महाराष्ट्र सरकारचे खुप खुप आभार सुशिक्षीत बेरोजगाराना हाताला काम नाही म्हणुण काई बेरोजगार युवकानी ऑटो टॅक्सी रिक्षा रोजगार करण्यासाठी युवकानी बॅका कडून कर्ज काडून कर्ज घेतले व 9 मार्च 2023 सरकारने अर्थ संकल्प माडला.
त्यात ST प्रवासात महीलाना 50% सुट दिली.या निर्णयाच सर्वत्र कौतुक केल जात आहे परंतु या निर्णयाने माझ्या सारख्या असंख्या ग्रामीण भागातील ऑटो टॅक्सी /चालकांनवर उपासमारीची वेळ आली. असुन आत्महत्या करण्याची पाळी आली आहे.
आज महाराष्ट्राचे ऑटो चालकांचे मुख्यमंत्री म्हणुन ओळखले जाणारे मा.एकनाथराव शिदे साहेब व उपमुख्यंमंत्री मा.देवेंद्र फडणविस साहेबांची कृपा ज्यानी आपल्या अनेक भाषनात सुशिक्षित बेरोजगाराना काम देणार म्हणुन रोजगार मेळावे घेताले.
पण ज्या सुशिक्षित बेरोजगारानी आपल्या ऑटो टॅक्सीच्या भरोशावर आपल्या कुटूंबाचा उदरनिर्वाह करून वआपल्या मुला - बाळाना दोन वेळच अन्न व शिक्षण पूर्ण करण्यासाठी त्या सुशिक्षत ऑटो टॅक्सी चालकावर आज उपासमारीची पाळी आली.
आत्महत्या करण्याची वेळ या माझ्या मायबाप सरकारने आज ऑटो चालकानवर आणली माझी मा.महाराष्ट्राचे ऑटोचालकांचे मुख्यंमंत्री शिदे साहेब व मा.फडणविस सायबाना माझ्या महाराष्ट्रातील सर्व ग्रामीण भागात ऑटो टॅक्सी चालवणारे सुशिक्षित ऑटो चालकांच्या वतीने मि विनंती करतो की.आम्हा सर्व ऑटो टॅक्सी चालकानवरील उपासमारीची पाळी व आत्महत्या करण्याची वेळ येऊ देऊ नका.
- ऑटो चालक : - देवराव कवडूजी पाटेवार चांदापूर ता.मुल.जि.चंद्रपूर तथा राजश्री शाहु महाराज ऑटो संघटना,मुल तालुका 8208539516