ब्रम्हपुरी तालुक्यातील आवळगाव येथील आकाश मेश्राम यांना डॉ. बि.आर.आंबेडकर रिसर्च सेंटर छ.संभाजीनगर येथे 'उत्कृष्ठ पत्रकारिता' पुरस्कार जाहीर.
अमरदीप लोखंडे!सहसंपादक
ब्रम्हपुरी : दिनांक,३०/०४/२३ साहित्यधारा बहुउद्देशिय सेवाभावी संस्था छ. संभाजीनगर आयोजित, प्रबुद्ध हो मानवा संघर्षातून उत्कर्षाकडे '२५८५ वी बुध्द जयंती उत्सवानिमीत्त' राज्यस्तरीय भव्य पुरस्कार वितरण सोहळ्याचं आयोजन दि.२९.०४.२०२३ ला डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन (रिसर्च) केंद्र छ. संभाजीनगर ला करण्यात आले होते.
यामध्ये राज्यातील साहित्यिक,शैक्षणिक,राजकीय, सामाजिक अशा विविध क्षेत्रात उत्तम कामगिरी बजावणाऱ्या व्यक्तींना पुरस्काराच्या स्वरूपाने निमंत्रित करण्यात आले होते. यामध्ये ब्रम्हपुरी तालुक्यातील आवळगांव येथील आकाश एम. मेश्राम यांना मा.जयश्री सोनकवडे प्रादेशिक उपायुक्त समाजकल्याण, छ. संभाजीनगर यांच्या हस्ते 'उत्कृष्ठ पत्रकारिता' पुरस्कार जाहीर करण्यात आला. पुरस्काराचे स्वरूप ट्राफि आणि सन्मानपत्र होते.
या कार्यक्रमाचे आयोजक प्रा.डॉ. संघर्ष सावळे हिस्ट्री ऑफ इकॉनॉमिक्स सोसायटी, स्टूडेंट आंबेसेडर, स्कॉटलॅण्ड यांनी आयोजन केले होते.कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे प्रा.डॉ.चेतना सोनकांबळे,प्रा.डॉ.भन्ते चंद्रबोधी,प्रा.डॉ.आनंद आहिरे,प्रा.डॉ.धिरजकुमार भारती,प्रा.डॉ. किर्तीमालिनी जावळे, प्रा.डॉ. वैशाली मेश्राम आदींच्या उपस्थित कार्यक्रम पार पडला.त्याला मिळालेल्या या पुरस्काराबद्दल मित्र व आप्तमंडळीत चेहऱ्यावर आनंद झडकत आहे आणि सर्वत्र त्याचे अभिनंदन करून कौतुक केल्या जात आहे.