श्री.संताजी महाविद्यालयात वार्षिकोत्सव संपन्न.
नरेंद्र मेश्राम
भंडारा : श्री संताजी कला व विज्ञान महाविद्यालय, पालांदूर (चौ.) येथे सत्र २०२२-२०२३ या वर्षाच्या वार्षिकोत्सवाचे आयोजन दि.१८ व १९ एप्रिल २०२३ ला करण्यात आले. दि.१८ एप्रिल २०२३ ला उद्घाटकीय सोहळा मा. सुजीतजी कुंभारकर, भंडारा यांच्या हस्ते मा. डॉ. सोमदत्तजी करंजेकर अध्यक्ष वैनगंगा बहुउद्देशीय विकास संस्था नागपूर, यांच्या अध्यक्षतेखाली , डॉ. प्रदीप बी. दहीकर प्राचार्य, श्री संताजी कला व विज्ञान महाविद्यालय पालांदूर (चौ.) डॉ. जि. आर. लांजेवार, उपप्राचार्य व श्री देवचंदजी करंजेकर संस्था सदस्य व रविंद्रनाथ मिश्रा सर, गुरुप्रीतसिंग व धीरेंद्र गायकवाड यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला.
कार्याक्रमाची सुरुवात ही दिपप्रज्वलन् व विद्यापीठ गीतांनी तसेच महाराष्ट्र गीतानी करण्यात आली. विद्यार्थ्यांनी कला कौशल्यातून आपला विकास करून राष्ट्र्निर्मितीमध्ये हातभार लावण्याचे आव्हान उद्घाटकीय मनोगतातून मा. सुजीतजी कुंभारकर यांनी केले. तर विद्यार्थ्यांनी महापुरुषांच्या विचाराचा आदर्श ठेऊन आपल्या जीवनाला घडविण्याचा प्रयत्न करावे असे आव्हान डॉ. सोमदत्तजी करंजेकर यांनी केले.
कार्याक्रमाचे प्रास्ताविकपर मनोगत प्राचार्य डॉ. प्रदीप बी. दहीकर यांनी केले. प्रास्ताविकपर मनोगतानंतर महाविद्यालयीन संतसौरभ वार्षीकांकाचे पाहुण्यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. तर संपादकीय मनोगत तसेच कार्यक्रमाचे डॉ. संजयकुमार निंबेकर यांनी केले. तर डॉ. रमेश बागडे यांनी आभार प्रदर्शन केले.
दि. १९ एप्रिल २०२३ ला समारोपीय कार्यक्रम प्राचार्य डॉ. प्रदीप बी. दहीकर यांच्या अध्यक्षतेखाली , मा. वीरसेन चहांदे , ठाणेदार पोलीस स्टेशन पालांदूर , यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. या प्रसंगी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षेची तयारी करून आपले जीवन यशस्वी करावे असे मोलाचे मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. रमेश बागडे तर आभार प्रा. नितिन थूल यांनी मानले.
या दोन दिवसीय वार्षिकोत्सवामध्ये एकल नृत्य , गीत गायन स्पर्धा, समूह नृत्य स्पर्धा , पाककला स्पर्धा, रांगोळी स्पर्धा,फुलांचा गालीछा स्पर्धा,हस्तकला स्पर्धा,आरती सजावट व पर्यावरण संवर्धन या संकल्पनेवर आधारित पोस्टर स्पर्धा व विविध मैदानी खेळांचे आयोजन करण्यात आले. या विविध स्पर्धांमध्ये महाविद्यालयीन बहुसंख्य विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला व विजेत्या विद्यार्थ्यांना पाहुण्यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र व स्मृती चिन्हे देऊन गौरविण्यात आले.
या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी महाविद्यालयीन प्राध्यापक व प्राध्यापाकेत्तर कर्मचारी तसेच विद्यार्थ्यांनी मोलाचे सहकार्य करून हा उत्सव मोठ्या आनंदाने साजरा केला. सदर कार्यक्रम संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. ब्राम्हनंदजी करंजेकर , संस्थेच्या सचिव डॉ. वृन्दाताई करंजेकर यांच्या मार्गदर्शनातून यशस्वीपणे पार पाडण्यात आला.