गडचिरोली येथे संत निरंकारी मिशन " मानव एकता दिवस" निमित्य रक्तदान शिबिर आयोजित.
★ संत निरंकारी फांऊडेशन,दिल्ली शाखा-गडचिरोली चा उपक्रम.
सुरेश कन्नमवार!मुख्य संपादक!एस.के. 24 तास
गडचिरोली : संत निरंकारी चॅरिटेबल फांउडेशन दिल्ली ब्रॉन्च - गडचिरोली यांच्या वतीने दिनांक, 23/04/2023 रविवार रोजी मानव एकता दिवसाचे औचित्य साधून महिला रुग्णालय गडचिरोली येथे " रक्तदान शिबिर " आयोजन करण्यात आले.
" रक्त नाडियों में बहे,नालियों में नही " - निरंकारी बाबा हरदेव सिंह जी महाराज यांनी रक्तदानाचे महत्व सांगितले आहे.
संत निरंकारी चॅरिटेबल फांऊडेशन च्या वतीने दर वर्षी संपूर्ण भारतात रक्तदान शिबिराचे आयोजन केले जाते.ब्रांच - गडचिरोली च्या वतीने सुद्धा रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.
सदर शिबिराचे उद्घाटन, मा. सुनील जी मेहेर प्रांत प्रचारक (आर.एस.एस) यांच्या हस्ते पार पडले. सदर कार्यक्रमाप्रसंगी हरिषजी निरंकारी,क्षेत्रीय संचालक वडसा डॉ,किशोर ताराम,रक्त संक्रमण अधिकारी सामान्य रुग्णालय गडचिरोली, पुरुषोत्तम डेंगानी सेवादल, शिक्षक,प्रकाश कुकरेजा,SNCF प्र.वडसा गडचिरोली ब्रांच चे मुखी, श्री गजानन तुंकलवार,डॉ, नारायण करेवार,डॉ,पेंदाम बालरोग तज्ञ,उप,गड इत्यादी प्रमुख पाहुणे उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन, भास्कर मडावी यांनी केले. आभार प्रदर्शन,डॉ.नारायण करेवार यांनी मानले. सदर कार्यक्रमाच्या यशस्वी साठी गडचिरोली ब्रांचचे सर्व सेवादल,संचालक,राजेश गुंडेवार,वसंत मेडेवार शिक्षक,बहनजी.महापुरुष, बालगोपाल उपस्थित होते.