माजी विद्यार्थी मेळाव्याचे आयोजन ; २५० वर माजी विद्यार्थी होणार सहपरिवार सहभागी.
एस.के.24 तास
नागभिड : जिल्ह्यातील नामवंत नेवजाबाई हितकारिणी शिक्षण संस्थेच्या नागभिड तालुक्यातील नवेगाव पांडव येथील ने.हि.विदयालयातील माजी विद्यार्थी व विद्यार्थिनी भव्य मेळावा आयोजणाची घोषणा नुकत्याच संपन्न झालेल्या आढावा बैठकीत माजी विद्यार्थी तथा राज्य पत्रकार संघाचे विभागीय अध्यक्ष,प्रा.महेश पानसे तथा मुख्याध्यापक श्री.ठाकरे यांनी केली.
सदर भव्य मेळावा १४ मे २०२३ ला विद्यालयाचे भव्य परिसरात आयोजीत करण्यात येणार असून यात विद्यालयात शिक्षण घेतलेले २५० वर विद्यार्थी व विद्यार्थिनी सहपरिवार सहभागी होणार आहेत.
मेळावा आजोजना संबंधाने आयोजीत आढावा बैठकीत सरपंचा,अँड.शमिंला रामटेके यांचेसह अनेक माजी विद्यार्थी उपस्थित होते.
या भव्य मेळावा आयोजनाचे संयोजक प्रा,महेश पानसे यांनी मेळावा आयोजनासंबधाने संपूर्ण रूपरेषा स्पष्ट करीत शालेय स्तरावर शिक्षण घेणारे विद्यार्थी हे निस्वार्थ पुणे,निरागसपणे अनेक वर्षं सोबत शिकतात.ते खरे मित्र असतात.ग़ामिण भागात शिकलेल्या विद्यार्थी व विद्यार्थिनी ना आपल्या शिक्षकाप़ती आदरभाव व्यक्त करण्याकरीता ह्या मेळाव्याचे आयोजन करण्यात येत असल्याचे स्पष्ट केले.
या प्रसंगी मुख्याध्यापक श्री.ठाकरे यांचे अध्यक्षतेखाली आयोजन समिती स्थापन करण्यात आली आहे.संयोजक म्हणून प्रा.महेश पानसे,सहसंयोजक म्हणून नरेंद्र चुऱ्हे राहणार असून अनेक माजी विद्यार्थ्यांची मेळावा समन्वयक म्हणून नेमणूक या प्रसंगी करण्यात आली आहे.
२५०वर माजी विद्यार्थी व विद्यार्थिनी सोबत परिवार जणांना आमंत्रीत करण्यात येणार असून सर्व निवुत्त शिक्षक व त्याचे परिवारास आमंत्रित करण्यात येऊन त्यांचा भावनिक व आदरपूर्वक सन्मान यावेळी करण्यात येणार आहे.
संपुर्ण दिवसभर चालणारा हा मेळावा दोन सत्रात आयोजीत करण्यात येणार असून संस्था प्रमुखा सोबत खासदार,आमदार यानाही आमंत्रीत करण्यात येणार असल्याचे संयोजक प्रा.महेश पानसे यांनी कळविले आहे.
यावेळी पंढरीनाथ दोनाडकर,नवनाथ नवघडे,अतूल ठेवले,निरंजन गजभे,राजू राऊत,नोगेश,बघमारे,अनिल नाकाडे,दादा राऊत,विजय पाटकर,प्रवीण जयस्वाल,अशोक समर्थ, शांताराम नवघडे, शांताराम निकुरे, जगदिश चौधरी व विद्यालयाचे शिक्षक,शिक्षकवृंद उपस्थित होते.