बेपत्ता योगेशची हत्या की आत्महत्या. ?
नरेंद्र मेश्राम!जिल्हा प्रतिनिधी!भंडारा
भंडारा : पवनी येथील युवा ठेकेदार,योगेश सिताराम लोखंडे हे मागील अंदाजे वय,३९ दिनांक, 27 मार्च दिवसापासून बेपत्ता होते.दिनांक ७ एप्रिलला पवनी ईटगाव रोडवरील प्रकाश रेहपाडे यांच्या शेतशिवार जवळील नाल्यामध्ये मृतदेह सापडला योगेश लोखंडे यांची हत्या की आत्महत्या या चर्चेला उधाण आलेले आहे.
शहरातील इमारत बांधकाम ठेकेदार म्हणून अशी ख्याती असलेल्या शनिवारी वार्डातील योगेश लोखंडे हे परिचित होते.मनमिळावू व साधी राहणीमान असलेल्या योगेशने दिनांक २७ मार्चला घर सोडून निघून गेले. त्यानंतर बरेच दिवस शोध घेतला असता कुठेच त्यांचा पत्ता लागत नव्हता दिनांक,7 एप्रिल ला शेत शिवाराजवळील नाल्यामध्ये मृतदेह असल्याची माहिती मिळताच पवनी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक निस्वादे,पोलीस उपनिरीक्षक राऊत पोलीस हवालदार हेमने यांच्या ताफ्यासह घटनास्थळी रुजू झाले घटनास्थळ पंचनामा करून शवच्छेदनासाठी मृतदेह शासकीय वैद्यकीय रुग्णालय नागपूर येथे पाठविण्यात आले.
पुढील तपास पवनी पोलीस करीत आहेत. योगेश लोखंडे हे अत्यंत प्रामाणिक सुस्भावी व मनमिळाऊ स्वभावाचा असल्याने शहरात हळहळ व्यक्त केल्या जात आहे.