जेष्ठ पत्रकार प्रदिप घाडगे डॉ.बाबासाहेब आंबेडकर आदर्श पत्रकारिता पुरस्काराने सन्मानित.

जेष्ठ पत्रकार प्रदिप घाडगे डॉ.बाबासाहेब आंबेडकर आदर्श पत्रकारिता पुरस्काराने सन्मानित.


नरेंद्र मेश्राम!जिल्हा प्रतिनिधी!भंडारा


भंडारा : दैनिक कळंब नगरी वृत्तपत्राचे मुख्य संचालक तथा भंडारा आवृत्तीचे संपादक जेष्ठ पत्रकार प्रदिप घाडगे यांना डॉ.बाबासाहेब आंबेडकर आदर्श पत्रकारिता पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.  


 त्यांनी पत्रकारिता क्षेत्रात केलेल्या कार्याची दखल घेऊन  एकता नेहरू युवा मंडळ केसलवाडाच्या  वतीने चिखली येथे आयोजित  क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले आणि प्रज्ञासूर्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची संयुक्त सार्वजनिक जयंती समारोह आणि पुरस्कार वितरण सोहळा कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांच्या हस्ते गौरवपत्र आणि सन्मानचिन्ह देऊन डॉ.बाबासाहेब आंबेडकर आदर्श पत्रकारिता पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले.  


 कार्यक्रमाच्या  अध्यक्षस्थानी आयोजन समितीचे अध्यक्ष विनोद शेंडे हे होते. मार्गदर्शक म्हणून राष्ट्रीय ओबीसी वर्ग मोर्चा भंडारा जिल्ह्याचे प्रचारक भोजराज गभणे प्रामुख्याने उपस्थित होते.तसेच विशेष अतिथी म्हणून स्वराज्य पोलीस मित्र माहिती अधिकार पत्रकार संघटना चे जिल्हाध्यक्ष शेखर जीभकाटे, पवनी पंचायत समितीच्या सदस्या कल्याणी कुर्जेकर, चिखली ग्रामपंचायत च्या सरपंच महंता देशपांडे, पोलीस पाटील सुरेश काटेखाये,मुलचंद देशपांडे,रामू काटेखाये,माडगीचे क्षेत्र सहाय्यक श्री.रंगारी साहेब,पुरुषोत्तम बारसागडे,ग्राम पंचायत सदस्य संजय देशपांडे,जोतिष तिरपुडे,सदस्या भारती कुर्झेकर,नमिता बारसागडे,पत्रकार पंकज वानखेडे, माहिती अधिकार व पत्रकार संघटनेचे जिल्हा संपर्क प्रमुख शेखर पारधी आदी मान्यवर उपस्थित होते.


कार्यक्रमाचे प्रस्ताविक  मुख्य आयोजक पत्रकार, जिल्हा युवा पुरस्कार पुरस्कृत जयेंद्र चव्हाण यांनी केले.सूत्रसंचालन जयंती आयोजन समारोह समितीचे  उपाध्यक्ष प्रतीक रामटेके यांनी केले.तर सचिव संजय उके यांनी आभार मानले.जेष्ठ पत्रकार प्रदिप घाडगे यांना डॉ.बाबासाहेब आंबेडकर आदर्श पत्रकारिता पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचे मित्रपरिवारांनी अभिनंदन करून पुढील यशस्वी वाटचालीकरिता शुभेच्छा दिल्या आहेत.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !