ओबीसी बांधवांनी बाबासाहेबांना व संविधानाला शाबूत ठेवणे हिच आमची पुढील लढाई आ.विजय वडेट्टीवार यांचे प्रतिपादन.

ओबीसी बांधवांनी बाबासाहेबांना व संविधानाला शाबूत ठेवणे हिच आमची पुढील लढाई आ.विजय वडेट्टीवार यांचे प्रतिपादन.


सुरेश कन्नमवार!मुख्य संपादक


व्याहाड खुर्द : (एस.के.24 तास) डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भगवान सिद्धार्थ गौतमाचा मानव कल्याणाचा धम्म आम्हा सर्वांना दिला. त्याच मानवी कल्याणाचा विचार करून भारतीय देश बांधवाकरिता कल्याणकारी संविधान दिले. संविधानाने देशातील तमाम ओबीसीचे कल्याण झाले. पण आज तेच संविधान धोक्यात आले.

धोक्यात आलेले संविधान शाबूत ठेवण्याकरिताच या बौद्ध विहारातून विचार प्रवाह विहार करीत राहावे या हेतूनेच मी सावली, ब्रम्हपुरी, सिंदेवाही, नागभीड, चिमूर तालुक्यात एकूण १३८ विहाराची निर्मिती केली. १३८ बौद्ध विहार बांधणारा महाराष्ट्रातील एकमेव एक आमदार आहे. मानवी कल्यन हेच ध्येय असून अडीच कोटी रुपये खर्च करून कॅन्सर आजाराची टेस्टिंग करीता गाडी स्वताच्या निधीमधून जनसेवेला समर्पित करीत आहे. मी आमदार आहे, हि बाबासाहेब आंबेडकरांची पुण्याई आहे. 

८५ टक्के आंबेडकरी जनता मला मतदान करून निवडून आणतात त्यामुळे त्यांना विसरणे अमानवीय कृत्य होईल याची जान ठेवून या समाजाचे हिताकरिता सदैव कार्यरत राहीन. अजूनही ओबीसी समाजाला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना समजला नाही. सर्व ओबीसी बांधवांनी बाबासाहेबांना समजून घेणे व त्यांनी देशाला बहाल केलेले संविधान शाबूत ठेवणे हिच पुढील लढाई राहणार आहे असे प्रतिपादन माजी मंत्री आमदार विजय भाऊ वडेट्टीवार यांनी फुले आंबेडकर जयंती महोत्सव तथा स्मृतिशेष डॉ. अर्जुनदास बिके यांच्या स्मृती दिन आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.    

 

सम्यक बौद्ध समाज किसान नगर येथे फुले आंबेडकर जयंती महोत्सव तथा स्मृतिशेष डॉ अर्जुनदास बिके यांच्या स्मृती दिवसाचे औचित्य साधून दिनांक ११ एप्रिल ते १४ एप्रिल २०२३ पर्यंत चार दिवसीय फुले मानेडकर जयंती सोहळा आयोजित केलेला होता.


 या चार दिवसीय जयंती सोहळ्यात दि. ११ पेरील २०२३ रोजी थायलंड वरून आणलेल्या बौद्ध मूर्तीची प्रतिष्ठापना, बौद्ध विहार बांधकामा करीता जमिन दान देणारे स्मृतिशेष डॉ. अर्जुनदास बिके यांच्या प्रतिमेचे अनावर, इंदुबाई बोरकर यांचे वतीने ‘बुद्ध आणि त्यांचा धम्म’ या धम्म ग्रंथाचे मान्यवरांना वितरण आणि मा. माजी मंत्री विजयभाऊ वडेट्टीवार यांचे प्रयत्नातून गौण खनिज निधीमधून बांधकाम केलेल्या बौद्ध विहाराचा लोकार्पण कार्यक्रम पार पडला. या बौद्ध विहार लोकार्पण कार्यक्रम पार पाडतांना माजी मंत्री आमदार विजयभाऊ वडेट्टीवार यांनी आपले विचार व्यक्त केले. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी आयोजक गोपाल रायपुरे जिल्हाध्यक्ष रिपाई हे होते. 


यावेळी सम्यक बौद्ध समाजाच्या वतीने स्मृतिशेष डॉ अर्जुनदास बिके यांनी बौद्ध विहार करीता समाजाला जमीनदान केल्याने डॉ अर्जुनदास बिके यांच्या परिवारातील वारसांन असलेले बिके परिवार व रायपुरे परिवार या सर्वांचा आमदार विजयभाऊ वडेट्टीवार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आले. तसेच यादिवशी महात्मा फुले जयंती निमित्याने “मि सावित्री बोलतेय” हा एकपात्री प्रयोग कलावंत संजय सर चिमूर यांनी सादर केला. सादरीकरणातून महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांचे जिवन चरित्र मांडण्यात आले. यानंतर रात्रोच्या सुमारास शेषराव खोब्रागडे व मिलिंद घडसे यांचा भिम गीतांचा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाचे सूत्र संचालन मारोतराव रायपुरे यांनी केले तर आभार रमेश डोंगरे यांनी मानले. 


सोहळ्याचा दुसरा दिवस म्हणजे दिनांक १२ एप्रिल २०२३ रोजी मा. जोगेन्द्रजी कवाडे माजी खासदार तथा पिरीपा राष्ट्रीय अध्यक्ष यांनी आंबेडकरी चळवळ आणि बौद्ध धम्म या विषयावर समाज प्रबोधनात्मक मार्गदर्शन झाले. तसेच रात्रोच्या सुमारास विजय शेंडे आणि संच यांचा भिम गित प्रबोधन कार्यक्रम व स्थानिक मुला मुलींचे सांस्कृतिक कार्यक्रम व स्नेहभोजन द्वारे कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. तसेच दि. १४ एप्रिल २०२३ रोजी भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती महोत्सव मिरवणूक द्वारा साजरा करण्यात आला. चार दिवसीय कार्यक्रमात गावातील ज्येष्ठ नागरिक तथा युवा कार्यकर्त्यांचा सत्कार करण्यात आला. 


या चार दिवसीय कार्यक्रमात मार्गदर्शन करण्या करीता सिद्धार्थ सुमन, मुनीश्वर बोरकर, दिनेश चिटनूरवार, नितीन गोहणे, हरदयाल गलगट, सुनिता उरकुडे, भावनाताई बिके, विद्यासागर बिके, किशोर बिके, किशोर पोतनवार,येशुताई पोतनवार, मुन्नाभाई बिके, इत्यादींनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे आयोजन सम्यक बौद्ध समाज किसान नगर यांचे वतीने करण्यात आले. 

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !