सौ.जिजाबाई बोबडे यांचे निधन,श्री गुरुदेव सेवा मंडळाच्या वतीने श्रद्धांजली अर्पण.
एस.के.24 तास
चंद्रपूर : नकोडा घुग्घुस येथील श्री गुरुदेव सेवा मंडळाचे उपासक मधुकर बोबडे यांच्या पत्नी सौ. जिजाबाई मधुकर बोबडे यांचे दि.३१/३/२०२३ रोजी दीर्घ आजाराने निधन झाले आणि दि. १/४/२०२३ रोजी दुपारी ११ वाजता नकोडा जवळील नदी तीरी अंत्यसंस्कार करण्यात आले.मृत्युसमयी त्यांचे वय ६५ होते.दोन मुलं, एक मुलगी,सुना आणि नातवंडे असा त्यांचा मोठा परिवार आहे.नकोडा श्री गुरुदेव सेवा मंडळाचे वतीने त्यांना भावपूर्ण आदरांजली अर्पण करण्यात आली.
याप्रसंगी नकोडाचे सरपंच,किरण बांदूरकर, ग्रामगीताचार्य बंडोपंत बोढेकर,एड.राजेंद्र जेनेकर, मधुकर मालेकर,श्री. झाडे आदींनी आपल्या शोकसंवेदना व्यक्त केल्या.