नदीपात्र कोरडे पडल्याने नदीकाठावरील गावात पाणी समस्या भेडसावणार ; चुलबंद नदीला वाळवंटाचे स्वरूप.
नरेंद्र मेश्राम!जिल्हा प्रतिनिधी!भंडारा
भंडारा : उन्हाळ्याची चाहूल लागण्यापूर्वीच चुलबद नदीतील पाण्याचा प्रवाह बंद झाला आहे.त्यामुळे नदीला वाळवंटाचे स्वरूप प्राप्त झाल्याचे दिसून येते आहे.जेमतेम फरवारी महिन्यातच हे नदीपात्र कोरडे पडल्याने भर उन्हाळाच्या दिवसात नदी काठावरील गावातील नागरिकांना तीव्र पाणी टंचाईचा सामना करावा लागणार असून अनेक गावातील नळयोजना बंद पडणार! अशी भयावह परिस्थिती आज घडीला दिसून येत आहे.
लाखांदूर तालुक्याला चुलबंद नदीचे वैभव प्राप्त झाले असून ती नदी अनेक गावाच्या शेजारून मार्गक्रमण करीत गेली आहे.याच नदीच्या पाण्यावर अनेक गावातील नागरिकांची तहान भागत आहे.तालुक्यातील अनेक गावातील नळ योजना याच नदीपाण्यावर अवलंबून आहेत.
याच नदीचा पाणी अनेक गावात नळयोजने द्वारे पोहचतो.या नदीला हिवाळ्यात व पाऊसाळ्यात भरपूर पाणी राहत असल्याने अनेक गावातील नळाला 24 तास पाणी पुरवठा सुरु असतो.मात्र उन्हाळाच्या दिवसात एप्रिल व मे या दोन महिन्याच्या कालावधीत अनेक गावातील नळाना पाणी येते नसल्याने अनेक गावातील नळ योजना ह्या बंद पडलेल्या असल्याचेही दिसून आले आहे.यावर्षी लाखांदूर तालुक्यातील नदी नाल्याना पाऊसाळ्याच्या दिवसात तीनदा पूर आले असले तरी सध्या स्थितीत नदी पात्र कोरडे पडून पाण्याचा प्रवाह बंद झालेला आहे.
सदर नदीवर अनेक गावात कुच करण्यासाठी विविध घाटावर पुलाचे बांधकाम करण्यात आले आहे.मात्र ते पूल नागरिकांना आवागमना व्यतिरिक्त कोणत्याही कामात येत नाही.त्या ऐवजी शासनाने पूल कम बंधारा ही योजना राबवून पुलाचे बांधकाम केले असतें तर आज घडीला नदी पात्र कोरडे पडले नसते.व गावागावातील पाण्याची समस्या सुटली असती.पण तसे झाले नाही.चुलबंद नदी मध्य अनेक गावातील नळ योजनेच्या मुख्य विहिरी आहेत.याच नदीतील पाणी नळयोजनेच्या माध्यमातुन गावागावातील नागरिकांच्या घराघरातील नळाना पोहचते.
मात्र लाखों लोकांची तहान भगवीणारी जीवनदायनी आज घडीला पडली आहे.त्यामुळे भर उन्हाळ्यात अनेक गावातील नागरिकांना पाणी मिळणार काय? की गावातील दूषित पाण्यावरच तहान भागववी लागणार! असा गंभीर प्रश्न सद्या नागरिकांना पडलाय. एवढे मात्र निश्चित आहे की चुलबंद नदीचे पात्र आता पासून कोरडे पडल्याने पुढील दोन तीन महिने पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न नागरिकांना भेड सावणार आहे. एवढे मात्र निश्चित आहे.