राष्ट्रसंत विचार साहित्य परिषदेतर्फे ग्रामजयंती प्रबोधन यात्रा.
एस.के.24 तास
चंद्रपूर : राष्ट्रसंत विचार साहित्य परिषद केंद्रीय समितीच्या वतीने चंद्रपूर ते राका (पळसगाव) या झाडीपट्टीतील प्रदेशात राष्ट्रसंत विचार साहित्याचा प्रचार प्रसार व्हावा या दृष्टीने विशेष दौऱ्याचे आयोजन करण्यात आले होते. व्यवसाय शिक्षणाचे महत्त्व,स्वावलंबन, जीवन शिक्षण, स्वच्छता अभियान, अंधश्रद्धा निर्मूलन, व्यसनमुक्ती, महिला सक्षमीकरण आदी महत्त्वाच्या विषयांवर प्रबोधनपर कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले होते.
याप्रसंगी माजी आमदार दिलीप बन्सोड, दादाजी संग्रामे,भजेपारचे सरपंच चंद्रकुमार बहेकार उपस्थित होते.तर दुसऱ्या दिवशीच्या युवा परिषदेत आजच्या युवकांपुढील आव्हाने आणि संधी या महत्त्वाच्या विषयांवर गोंदिया जिल्हा पोलिस अधीक्षक निखिल पिंपळे , ग्रामगीताचार्य बंडोपंत बोढेकर, तहसिलदार गणेश खताळे, दुग्गीपारचे ठाणेदार सिंगणजुडे आदींनी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन, व्यवसाय कौशल्ये, लघुउद्योग विकास , व्यक्तिमत्व विकास या विषयावर उपस्थित युवकांना सविस्तर मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संयोजक मधुसूदन दोनोडे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महेंद्र दोनोडे यांनी केले.
सांयकालीन पंचरंगी प्रबोधनपर कार्यक्रमात सुनिल इखारे, आशिष गावतुरे,पियुष ढाक,संघर्ष नांदे ,सुमित गजपुरे,साहिल बुलबुले यांनी जबरदस्त लोक वाद्यवादन करून व्यसनमुक्ती, व्यवसाय शिक्षण, जीवन शिक्षण,महिला सक्षमीकरण आदी विषयांवर जागृती केली.तसेच नकला एकपात्री प्रयोग करून जनप्रबोधनपर कार्यक्रम सादर केला. परतीच्या प्रवासात राष्ट्रीय अभयारण्य नवेगावबांध ( गोंदिया )येथे भेट देण्यात आली.