प्रकल्पांमुळे उद्ध्वस्त होणाऱ्या आदिवासींची वेदना साहित्यात झिरपत नाही. - लेखिका डॉ.स्ट्रीमलेट डखार यांची खंत.



प्रकल्पांमुळे उद्ध्वस्त होणाऱ्या आदिवासींची वेदना साहित्यात झिरपत नाही. - लेखिका डॉ.स्ट्रीमलेट डखार यांची खंत.


एस.के.24 तास


गडचिरोली : १५ व १६ एप्रिलला गडचिरोली येथे पहिले आदिवासी महिला साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यात सहभागी होण्यासाठी आल्या असता डखार यांनी लोकसत्ता कार्यालयाला सदिच्छा भेट दिली.नागर संस्कृतीपासून दूर व अलिप्त राहिलेले संबंधित प्रदेशातील मूळचे रहिवासी म्हणजे आदिवासी. आदिवासींचा धर्म क्षेत्रीय म्हणजे त्यांच्या निवासस्थानापुरता मर्यादित असतो. त्यांची संस्कृती, तीर्थक्षेत्रेही त्यांच्या भागातच असतात. परंतु, आता विकासाच्या नावावर आदिवासींची मूळ संस्कृतीच धोक्यात आली आहे. मात्र असे असतानाही प्रकल्पांमुळे उद्ध्वस्त होणाऱ्या आदिवासींची वेदना आदिवासी साहित्यिकांमध्येही पुरेशा प्रमाणात झिरपत नाही, अशी खंत साहित्य अकादमीच्या सदस्य व मेघालयातील आदिवासी समुदायाच्या लेखिका डॉ. स्ट्रीमलेट डखार यांनी व्यक्त केली.


१५ व १६ एप्रिलला गडचिरोली येथे पहिले आदिवासी महिला साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यात सहभागी होण्यासाठी आल्या असता डखार यांनी लोकसत्ता कार्यालयाला सदिच्छा भेट दिली. यावेळी त्यांनी आदिवासी साहित्यातील महिलांचे योगदान, वर्तमान राजकीय स्थिती अशा विविध विषयांवर भाष्य केले.


डॉ.स्ट्रीमलेट डखार म्हणाल्या,मी मूळची मेघालयाची आहे.आमच्या राज्यातून गौण खनिजाचे ट्रक भरून शेजारच्या बांगलादेशात जातात. चौफेर लूट सुरू आहे. अशा स्थितीत आपल्या हक्कासाठी साहित्यातून जागृती होणे गरजेचे आहे.देशभरातील विविध प्रांतामध्ये आदिवासी समाजातील लेखिका अतिशय प्रभावी लिहीत आहेत. परंतु, मुख्य प्रवाहाच्या साहित्य क्षेत्राने त्यांना अद्याप आपले म्हणून स्वीकारलेले दिसत नाही. एक अदृश्य भिंत अजूनही कायम आहे. परंतु, अनुवादामुळे हे चित्र काही प्रमाणात का होईना, बदलताना दिसतेय ही चांगली गोष्ट आहे.


आदिवासी लेखिकांमध्येही दोन प्रकार आहेत. पहिल्या प्रकारातील लेखिकांवर अजूनही पुरुषप्रधान संस्कृतीचा पगडा आहे. त्यामुळे त्या तशाच मानिसकतेतून लिहितात. ज्या लेखिकांनी मात्र असा पगडा झुगारून लिहिण्याचे ठरवले आहे त्यांचा लिखानातील स्त्रीवाद वाचकांना अंतर्मुख करीत आहे.मुद्दा लिखाणाचा पिंड कसा आहे हा नाहीच आहे.आतापर्यंत केवळ अंधारात आयुष्य काढणाऱ्या या महिला आज लेखणीद्वारे व्यक्त होताहेत,हे जास्त महत्त्वाचे आहे,याकडे लक्ष वेधले.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !