एस.के.24 तास
ब्रह्मपुरी : (अमरदीप लोखंडे) १४/०४/२३ विश्वरत्न क्रांतीसुर्य परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 132 जयंती मोठ्या थाटामाटात साजरी करण्यात आली.या वेळी परमपुज्य डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे रथावर विराजमान केलेल्या तैल चित्राची गावात मिरवणूक काढून ग्रामपंचायत कार्यालयातील त्यांच्या फोटोला पुष्पहार टाकून त्यांना अभिवादन करण्यात आले.
सदर मिरवणूकी दरम्यान समता सैनिक दलाचे भीमसैनिक, अ-हेरनवरगाव चे बिट जमादार श्री अरुण पिसे, पोलीस शिपाई नरेश कोडापे,निलेश कांबळे,अमोल ठेंगरी,प्रीतम बागडे यांच्या चोक बंदोबस्त व अथक सहकार्याने मिरवणूक शांततेत पार पडली.
नगर मिरवणूक ग्रामपंचायत कार्यालयातील बाबासाहेब आंबेडकर यांच्या फोटोला पुष्पहार घालून अभिवादन केल्यानंतर मिरवणूकीचे बौद्ध विहार अ-हेरनवरगाव येथे तिचे विसर्जन करण्यात आले.या मिरवणुकीत अ-हेर नवरगाव येथील बहुसंख्य बौद्ध उपासक, उपासीका विद्यार्थ्यांनी बंधू भगिनींनी सहभाग घेतला.या दिनाचे औचित्य साधून सायंकाळी सह भोजनाचा कार्यक्रम ठेवण्यात आला.