ने.हि.महाविद्यालयात महात्मा फुले जयंती उत्सव.
अमरदीप लोखंडे
ब्रह्मपुरी : दिनांक,१२/०४/२३ येथील नेवजाबाई हितकारिणी महाविद्यालयातील जयंती उत्सव समितीच्या वतीने थोर क्रांतीदूत,स्त्री शिक्षणाचे पुरस्कर्ते व समाजसुधारक महात्मा जोतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रम घेण्यात आला.
सर्वप्रथम महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ डी .एच. गहाणे व प्राचार्य डॉ हर्षा कानफाडे यांनी प्रतिमांना माल्यार्पण करुन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.याप्रसंगी महात्मा फुलेंच्या सत्यशोधक विचारांवर प्रकाश टाकला गेला.कार्यक्रमाप्रसंगी डॉ सुभाष शेकोकर, डॉ राजेंद्र डांगे, डॉ असलम शेख, डॉ धनराज खानोरकर, डॉ रेखा मेश्राम,अधीक्षक संगीता ठाकरे, डॉ मोहन कापगते, डॉ युवराज मेश्राम,डॉ तात्या गेडाम, डॉ किशोर नाकतोडे, डॉ भास्कर ,डॉ योगेश ठावरी, डॉ अरविंद मुंगोले प्रा जयेश हजारे,प्रा मिलिंद पठाडे, पर्यवेक्षक प्रा आनंद भोयर,प्रा मोहूर्ले,प्रा ठोंबरे,रोशन डांगे,प्रज्ञा मेश्राम यांनी प्रतिमेला पुष्प वाहून अभिवादन केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी समिती प्रभारी डॉ. कुलजित कौर गिल,डॉ.धनराज खानोरकर, डॉ युवराज मेश्राम,प्रा विनोद घोरमडे,प्रा धिरज आतला,जगदिश गुरनुले,रामटेकेंनी परिश्रम घेतले.