माजी आमदार चरण वाघमारे यांच्या हाती भारत राष्ट्र समिती पक्षाचा झेंडा; हैदराबाद येथे कार्यकर्त्यांसह घेतला प्रवेश.



माजी आमदार चरण वाघमारे यांच्या हाती भारत राष्ट्र समिती पक्षाचा झेंडा; हैदराबाद येथे कार्यकर्त्यांसह घेतला प्रवेश.


एस.के.24 तास


भंडारा : चंद्रशेखर राव यांच्या बीआरएसपी पक्षाची विदर्भातील अनेक माजी आमदारांना भुरळ पडली आहे. तेलंगणातील विकास पाहून तुमसर – मोहाडी विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार चरण वाघमारे हेसुद्धा बीआरएसपी पक्षाच्या संपर्कात होते. महाराष्ट्रासह जिल्ह्यातही अशा विकासाची पाळेमुळे रुजवावी यासाठी चंद्रशेखर राव यांच्या संपर्कात असलेले माजी आमदार चरण वाघमारे यांनी भारत राष्ट्र समितीमध्ये प्रवेश केला.


हैदराबाद येथील मुख्यमंत्री केसीआर यांच्या शासकीय निवासस्थानी काल माजी आ. वाघमारे यांनी कार्यकर्त्यांसह भारत राष्ट्र समितीमध्ये पक्षप्रवेश केला. नवभारत निर्माण करण्याचे उद्दिष्ट ठेवून, प्रत्येक भारतीय नागरिकाला त्याचा मूलभूत हक्क मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणे हे या पक्षाचे मुळ उद्दिष्ट असल्याने या पक्षाचा झेंडा हाती घेतला असल्याचे वाघमारे यांनी सांगितले.


चंद्रशेखर राव यांनी नांदेडला सभा घेतली तेव्हा त्यांनी तेलंगणात शेतकऱ्यांचा विकास कसा झाला, त्यांच्या योजना कशापद्धतीने राबवल्या गेल्या, हे त्यांनी नांदेडच्या सभेत सांगितलं. मीसुद्धा त्यांच्याशी भेटून प्रभावित झालो होतो, त्यामुळे मी या पक्षासोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे, असे माजी आमदार चरण वाघमारे म्हणाले.


महागाईच्या तुलनेत शेतकऱ्यांच्या शेतमालाला भाव मिळत नाही. निघणारे पीक परवडणारे नाही. मात्र तेलंगणा सरकार अशा शेतकऱ्यांसाठी वरदान ठरतील अशा योजना सातत्याने राबवित आहेत. त्यामुळे मीसुद्धा बीआरएसच्या संपर्कात आहे. तसाही मी स्वतंत्र आहे. त्यामुळे जो शेतकऱ्यांच्या पाठीशी उभा राहील त्यांच्यासोबत जाण्यास काहीच हरकत नाही, असे मला वाटते असे वाघमारे यांनी सांगितलं.


तेलंगणासारख्या योजना महाराष्ट्र राज्यात का राबवल्या जात नाही, असा प्रश्न माझ्याही मनात येतो. तेलंगणातील शेतकऱ्यांचा विकास कसा झाला, हे या राज्यातील लोकांना सांगणं गरजेचं आहे. महाराष्ट्रात भारत राज्य समिती म्हणजे बीआरएसला प्रतिसाद मिळत आहे, असेही ते म्हणाले.


तेलंगणा सरकार घेते शेतकरी हिताचे निर्णय : - 


तेलंगणा सरकार शेतकरी हिताचे निर्णय घेते, त्यामुळे सामान्य माणसाचा कसा विकास साधता येईल, यासाठी विदर्भातील माजी आमदार वाघमारे यांनी तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांच्या संपर्कात राहून अभ्यास केला आणि विकासासाठी या पक्षाची धुरा हाती घेत असल्याचे पक्ष प्रवेश केल्याचे माजी,आमदार चरण वाघमारे यांनी सांगितले.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !