चक्क पोटच्या बापानेच केल्या चिमुकल्याची हत्या ; मूल तालुक्यातील राजोली येथील घटना.

डावीकडे आरोपी,गणेश विट्टल चौधरी उजवीकडे मृतक,प्रियांशु गणेश चौधरी 

चक्क पोटच्या बापानेच केल्या चिमुकल्याची हत्या ; मूल तालुक्यातील राजोली येथील घटना.


नितेश मँकलवार!उपसंपादक


मुल : दारूच्या आहारी गेलेल्या एका पित्याने पोटच्या मुलाची गळा दाबुन खुन केल्याची घटना रविवारी पहाटे 5 वाजताच्या दरम्यान राजोली येथे घडली. गळा दाबुन हत्या केलेल्या पित्याने स्वतःच्या गळावर चाकुने वार करून आत्महत्या suicide करण्याचा प्रयत्न केला.प्रियांशु गणेश चौधरी वय,3 वर्षे असे गळा दाबुन खुन केलेल्या बालकाचे नांव आहे तर गणेश विट्टल चौधरी वय,31 वर्षे असे पोटच्या मुलाचा खुन करणाऱ्या पित्याने नांव आहे. 


मूल तालुक्यातील राजोली येथील गणेश विट्टल चौधरी वय 31 वर्षे हा आपल्या पत्नी काजल आणि मुलासह राजोली येथे राहात होता, हनुमान जन्मोत्सवाच्या दिवशी तो दारू पिऊन पत्नीला मारहाण केल्याने ती घरून निघुन गेली, घरी स्वतः गणेश आणि मुलगा प्रियांशु राहात होता, दरम्यान रविवारी पहाटे 5 वाजता दरम्यान त्याने दारूच्या नशेत मुलगा प्रियांशु याचा गळा दाबुन खुन केला,आणि स्वताच्या गळावर चाकुने वार करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. 


सदर घटनास्थळावर मूल पोलीस पोहचुन पंचनामा केला असुन जखमी गणेश चौधरी याला उपचारार्थ मूल उपजिल्हा रूग्णालयात पाठविण्यात आले आहे. पुढील तपास मूल पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक,सुमित परतेकी यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.


आता पोटच्या मुलाचा खुन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न याचपरिवारातुन झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केल्या जात आहे.

Tags

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !