आंबाडी येथे रामनवमी उत्साहात साजरी.

 


आंबाडी येथे रामनवमी उत्साहात साजरी.


एस.के.24 तास


भंडारा : (नरेंद्र मेश्राम) नजीकच्या आंबाडी येथील बस स्थानक चौकात भक्ती गीतं,भजन पूजन करून वाटसरूनसाठी महाप्रसाद वितरण सोहळा मोठ्या थाटा माटात साजरा करण्यात आला या कार्यक्रमात पुरुष मंडळी व भिलेवाडा महीला भजन  मंडळाचा कार्यक्रम उत्साहात साजरा करण्यात आला.


या कार्यक्रमाचे उद्घाटन आंबाडी गट ग्रामपंचायत सरपंच भजन भोंदे, ग्रामविकास अधिकारी श्यामकुमार बिलवणे,तंटामुक्त समिती अध्यक्ष प्रा. संजय भुरे,माजी तंटामुक्त समिती अध्यक्ष धनराज भुरे,भंडारा पंचायत समिती सदस्य राजेश वंजारी, ग्रामपंचायत सदस्य मनोहर धुर्वे  माजी  ग्रामपंचायत  सदस्य भाष्कर बावनकर रोजगार  सेवक सुधाकर बावनकर,सजन भोंदे, आरोग्य  विभागाचे प्रशांत भुरे,रवींद्र राऊत,सामाजिक कार्यकर्ता सजन भोंदे,दिलीप नशिने ग्रामपंचायत सदस्य मेघा भुरे अमीर बोरकर, भिलेवाडा येथील महिला भजन मंडळाचा कार्यक्रम केवळराम उके महाराज यांच्या नेतृत्वात गीता शेंडे,मिरा नेवारे, सुषमा पंचबुधे आनंदराव निंबार्ते यांनी आध्यत्मिक विचाप्रवर्तन गितगायनातून केले,भास्कर बावनकर व शारदाउत्सव मंडळाच्या वतीने महाप्रसाद वितरण करण्यात आले.


#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !