एकच मिशन जुनी पेन्शन हा प्रमुख अजेंडा आहे. - सुधाकर अडबाले यांचे प्रतिपादन. ★ सेवानिवृत्त 70 शिक्षक /मुख्याध्यापकांचा सत्कार करण्यात आला.



एकच मिशन जुनी पेन्शन हा प्रमुख अजेंडा आहे. - 
सुधाकर अडबाले यांचे प्रतिपादन.


★ सेवानिवृत्त 70 शिक्षक /मुख्याध्यापकांचा सत्कार करण्यात आला.


नरेंद्र मेश्राम!जिल्हा प्रतिनिधी!भंडारा


भंडारा : विदर्भ माध्यमिक शिक्षक संघ जिल्हा भंडाराचे जिल्हा अधिवेशन दि  ९ एप्रील रोजी संताजी मंगल कार्यालय भंडारा येथे  या अधीवेशनाचे अध्यक्ष स्थाणी शिक्षक आमदार सुधाकर अडबाले होते. 



यावेळी एकच मिशन जुनी पेन्शन हा प्रमुख अजेंडा असून शिक्षकांना जुनी पेन्शन योजना मिळाल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही.व सर्व शिक्षकांच्या समस्या निकाली काढण्यासाठी सभागृहात  मागणी लावून धरणार असल्याचे मत त्यांनी अध्यक्षीय भाषणातून व्यक्त केले.


या कार्यक्रमाचे उदघाटक म्हणून माजी शिक्षक आमदार व्ही . यु . डायगव्हाणे,जिल्हा परिषद भंडाराचे अध्यक्ष गंगाधर जिभकाटे,कांग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष मोहन पंचभाई, शिवसेना जिल्हा प्रमुख नरेश डहारे,विजूक्ता नागपूर विभागाचे महासचिव अशोक गव्हाणकर   गडचिरोली,सिनेट सदस्य अजय लोंढे, गोपाल बावनकर,श्रीधर खेडीकर प्रांतीय उपाध्यक्ष, जुनी पेन्शन संघटनेचे अध्यक्ष संतोष मडावी,विजुक्ताचे मार्तंड गायधणे, शिक्षक भारतीचे विनोद किंदरले, प्रा. ज्ञानेश्वर सोनवणे, मुख्याध्यापक संघांचे रेखा भेंडारकर, जी. एन. टिचकुले,जि. प. माध्यमिक शिक्षक संघटनेचे अध्यक्ष ओ. बी. गायधने, शिक्षकेत्तर संघटनेचे अध्यक्ष सैनपाल वासनिक इत्यादी प्रामुख्याने उपस्थितीत होते.


विदर्भ माध्यमिक शिक्षक संघ जिल्हा अधिवेशन प्रसंगी पुढे ते म्हणाले  शिक्षक आमदार म्हूणन सर्व शिक्षकांनी पहिल्या पसतीने निवडून दिले असून हा सर्व शिक्षक संघटना आणि शिक्षकाचा विजयी आहे. त्यामुळे मी शिक्षकांच्या समस्या सोडविण्यासाठी सक्षम आहे. जिल्हा परिषद शाळेतील कंत्राटी पद्धतीने तूटपुंज्या मानधनावर काम करणाऱ्या शिक्षकांचेही प्रश्न लावून धरणार, याशिवाय इतर विभागातील शाळेत कार्यरत असणाऱ्या शिक्षकांच्या समस्या सोडविण्यासाठी प्राधान्य देणार असून सर्व शिक्षकांना जुनी पेन्शन मिळाला पाहिजे यासाठी विदर्भ माध्यमिक शिक्षक संघ कठीबद्ध आहे.असे त्यांनी मार्गदर्शन केले.


या अधिवेशनातील प्रमुख मागण्यान मध्ये शाळा अनुदानाचा वाढीवटप्पा मंजूर. करणे शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी पद भरती, शिक्षकेत्तर कर्मचारी आकृतीबंध लागु करणे . शालेय कर्मचाऱ्याच्या सेवेच्या १० , २० , ३० वर्ष सुधारीत आश्वासित प्रगती योजना लागू करावी,वैद्यकीय कॅशलेस योजना लागू करणे, वरीष्ठ व निवडश्रेणी विना अट लागु करणे,  जि . प . शिक्षकांचे नियमीत वेतन १ तारखेला करणे, सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची नियमीत पेंशन अदा करणे, घडयाळीत तासिकेवरील शिक्षकांचे नियमीत मानधन व सेवेत सामावून घेणे,जि.प.शिक्षकांना अधिकारी वर्ग २ मध्ये पदोन्नत करणे, न.प.शाळेतील कर्मचाऱ्यांच्या नियमीत वेतन  तारखेला करणे,जी . पी . एफ . हिशोब पावत्या देणे ,उच्च माध्यमीक शिक्षकांना वैद्यकीय प्रतिपूर्ती योजना लागू करणे, आदिवासी व समाज कल्याण आश्रम शाळेतील शिक्षक व कर्मचाऱ्यांच्या समस्येवर चर्चा करणे . प्राथमिक व कनिष्ठ महाविद्यालयांच्या समस्येबाबद .  CBSE / ICSE शाळेतील कर्मचाऱ्यांच्या समस्येवर चर्चा करणे


याप्रसंगी विदर्भ माध्यमिक शिक्षक संघांचे सदस्य असलेल्या जिल्ह्यातील सेवानिवृत्त सत्तर शिक्षक व मुख्याध्यापक यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.प्रास्ताविक जिल्हाध्यक्ष सुधाकर देशमुख यांनी केले असून जिल्हा कार्यवाह राजेश धुर्वे यांनी अहवाल वाचन केले,संचालन सुप्रिया टेम्भूर्णे व शामसाद सय्यद  यांनी तर जिल्हाकार्याध्यक्ष चंद्रशेखर रहांगडाले यांनी आभार मानले.


या जिल्हा अधिवेशनास जिल्ह्यातील सर्व खाजगी प्राथमिक,माध्यमिक,उच्च माध्यमिक,जि.प.व न.प.तसेच आदिवासी आश्रम शाळा, इंग्रजी माध्यमाच्या शाळा तसेच समाज कल्याण विभागातील सर्व शिक्षक, संघटनेचे तालुका /जिल्हा पदाधिकारी तसेच महिला शिक्षिका मोठया संख्येने उपस्थित होते.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !