सी - 60 पथकातील जवानाचा मृतदेह तलावात तरंगताना आढळला.
एस.के.24 तास
गडचिरोली : ( विशाल बांबोळे) जिल्हा पोलिस दलातील नक्षलविरोधी सी-60 पथकातील एका जवानाचा मृतदेह तलावात तरंगताना आढळून आल्याची घटना बुधवार 5 एप्रिल रोजी चामोर्शी तालुक्यातील रेगडी येथून पुढे येत आहे. या घटनेने पोलीस विभागात खळबळ उडाली आहे. आकाश मुन्सी लेकामी (30), रा. पिपरी ता. एटापल्ली असे मृतक जवानाचे नाव आहे.
आकाश लेकामी हे गडचिरोली जिल्हा पोलिस दलाच्या सी 60 या नक्षलविरोधी अभियान पथकात कार्यरत होते. पत्नी माहेरी असल्याने ते मंगळवार 4 एप्रिल रोजी सासरवाडीत अडंगेपल्ली येथे एक दिवसाची सुट्टी घेऊन गेल्याचे कळते. तर रेगडी येथील कन्नमवार तलावात ते 4 एप्रिलला दुपारी तीन वाजता पोहोण्यासाठी एकटेच गेले होते अशीही माहिती पुढे येत असून ते परत न आल्याने नातेवाईकांनी त्यांचा सर्वत्र शोध घेतला असता ते सापडले नाहीत. बुधवार 5 एप्रिल रोजी त्यांचा मृतदेह पाण्यावर तरंगताना आढळला.
आकाश लेकामी हे गडचिरोली जिल्हा पोलिस दलाच्या सी 60 या नक्षलविरोधी अभियान पथकात कार्यरत होते. पत्नी माहेरी असल्याने ते मंगळवार 4 एप्रिल रोजी सासरवाडीत अडंगेपल्ली येथे एक दिवसाची सुट्टी घेऊन गेल्याचे कळते. तर रेगडी येथील कन्नमवार तलावात ते 4 एप्रिलला दुपारी तीन वाजता पोहोण्यासाठी एकटेच गेले होते अशीही माहिती पुढे येत असून ते परत न आल्याने नातेवाईकांनी त्यांचा सर्वत्र शोध घेतला असता ते सापडले नाहीत. बुधवार 5 एप्रिल रोजी त्यांचा मृतदेह पाण्यावर तरंगताना आढळून आल्याने धक्काच बसला.
घटनेची माहिती पोलीसांना दिली असता घटनास्थळ गाठून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवला असल्याचे कळते. या जवानाचा मृत्यू नेमका कसा झाला ? घातपात की अपघात ? हे उत्तरीय अहवालात स्पष्ट होणार आहे. पुढील तपास रेगडी पोलिस मदत केंद्राचे उपनिरीक्षक कल्पेश मगरे तपास करत आहेत.