पाथरी येथे आज 5:00 वा.क्रिडांगणाच भूमिजन.
एस.के.24 तास
सावली : तालुक्यातील पाथरी शहरामध्ये मा.विजय भाऊ वडेट्टीवार आमदार ब्रम्हपुरी विधानसभा क्षेत्र तथा माजी कॅबिनेट मंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या हस्ते क्रिडांगणाच्या भूमिजनाचा कार्यक्रम आज दिनांक 11/4/2023 रोजी सायंकाळी 5 वाजता होणार आहे. पाथरी तथा परिसरातील युवकांना शारीरिक व्यायाम व इतर खेळ खेळण्यासाठी व युवकांची शारीरिक क्षमता वाढविण्याच्या दृष्टीने या क्रिडांगणाची निर्मिती होत असून सदर भूमिपूजनाच्या कार्यक्रमास पाथरी तथा परिसतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, अशी विनंती पाथरी येथील प्रफुल तुम्मे उपसरपंच ग्रामपंचायत पाथरी यांनी केली आहे.
या कार्यमास उदघाटक मा. विजय भाऊ वडेट्टीवार आमदार ब्रम्हपुरी विधानसभा क्षेत्र तथा माजी कॅबिनेट मंत्री महाराष्ट्र राज्य, सौं अनिता लोकनाथ ठीकरे सरपंच ग्रामपंचायत पाथरी,श्री.प्रफुल तुम्मे उपसरपंच ग्रामपंचायत पाथरी,श्री राजेश सिद्धम माजी सरपंच, श्री,मेघराज वालदे,रोशन ठीकरे,राकेश चेन्नूरवार, सतीश उंदीरवाडे,अश्विन जैस्वाल,पुंडलिक भैसारे, अमित ठीकरे तंटामुक्ती अध्यक्ष तथा सर्व ग्रामपंचायत सदस्य व पाथरी शहरातील ग्रामस्थ उपस्थित असणार आहेत.