ब्रम्हपुरी शहराच्या मुख्य चौकात एक दोन महिन्यात ट्रॅफिक सिग्नल लागणार. - विलास विखार, न.प.बांधकाम सभापती
★ प्रशांत डांगे यांच्या मागणीला यश.
★ दोन दिवसांपूर्वी एस.के.24 तास वर बातमी लागली होती.
अमरदीप लोखंडे!सहसंपादक
ब्रम्हपुरी : दिनांक,२८/०४/२३ ब्रम्हपुरी शहर शैक्षणिक,आरोग्य क्रीडा,आदी क्षेत्रात अग्रेसर आहे.तसेच चंद्रपूर जिल्ह्यातील शेवटचा तालुका आणि गडचिरोली जिल्ह्याच्या सीमेलगत असलेले शहर असून जिल्ह्याबाहेरील शिक्षणासाठी विद्यार्थी येत असतात तसेच उपचारासाठी सुद्धा नागरिक येत असतात.ब्रम्हपुरी शहरात मोठी बाजारपेठ दळणवळणाच्या मुबलक साधने,शहराचा वाढता विस्तार लोकसंख्या,वाढते वाहने यामुळे शहराच्या मुख्य रस्त्यावर वाहनांची वर्दळ असते.
अनेक नागरिक बेजबाबदारपणे वाहने चालवत असल्याने अनेक अपघात झाले त्यात अनेकांचे जीव सुद्धा गेलेत.अपघात रोखण्यासाठी, नागरिकांना नियम अवगत व्हावे यासाठी शहराच्या मुख्य रस्त्यावर ट्रॅफिक सिग्नल यंत्रणा लावण्यासबंधीची मागणी सामाजिक कार्यकर्ता प्रशांत डांगे यांनी नगरपरिषद ब्रम्हपुरी यांना दिलेल्या निवेदनातून केली होती. सदर मागणी रास्त असून जनहित लक्षात घेता नगरपरिषदेने मागणीची तात्काळ दखल घेत शहरातील मुख्य रस्त्यावर ट्रॅफिक सिग्नल यंत्रणा येत्या एक दोन महिन्यात लावण्यात येणार असून यासाठी लागणारा निधी व ट्रॅफिक सिग्नल यंत्रणेला मंजुरी मिळालेली आहे.
ख्रिस्तानंद चौक,छत्रपती शिवाजी महाराज चौक, बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे चौक या ठिकाणी ट्रॅफिक सिग्नल यंत्रणा लावण्यात येणार आहे. व लवकरच या कामाला सुरुवात होणार अशी माहिती ब्रम्हपुरी नगरपरिषदेचे बांधकाम सभापती तथा गटनेता विलास विखार यांनी दिली.