शासकीय योजनांची जत्रा महाराजस्व अभियान शिबीर 2023 मुलचेरा तालुक्यात देवदा येथे आयोजन.
कार्यकारी संपादक : विशाल बांबोळे
मुलचेरा : दि 25.04.2024 ला देवदा येथे शासकीय योजनांची जत्रा महाराजस्व अभियान शिबीर 2023 मुलचेरा तालुक्यात देवदा येथे आयोजन करण्यात आले कार्यक्रमाचे अध्यक्ष मा.भाग्यश्री ताई आत्राम यांच्या हस्ते जमिनीचे विविध प्रकारचे कागदपत्रे देण्यात आले.एकात्मिक बाल् विकास प्रकल्प यांच्या कडून् आहार प्रदर्शन स्टॉल लावण्यात आले. तसेच पहिली खेप असणाऱ्या गरोदर स्थनदा मातांना बेबी किट यांचे वाटप करण्यात आले.
कृषी विभाग यांच्या कडून ट्रॅक्टर चे वाटप करण्यात आले.आरोग्य विभाग यांच्या कडून रुग्णांना मोफत तपासणी व औषध उपचार. वन विभाग कडून त्यांच्या योजनाची माहिती देण्यात आली. तसेच पोलीस विभागाकदुन सुद्दा योजनाची माहिती देण्यात आली.. तसेच शालेय विद्यार्त्यांचे विविध नृत्य सादर करण्यात आले. या कार्यक्रमात देवदा,बोलेपल्ली पूलिगुंदम हेतलकसा मोरखंडी वेंगनूर गरंजी सुरगाव गट्टा या गावचे ग्रामस्थ उपस्तित होते.