2 लाख बक्षीस असलेल्या 1 जहाल नक्षली ला पोलीसांनी केली अटक.
एस.के.24 तास
गडचिरोली : दिनांक,१८ एप्रिल 2023 च्या सकाळी एका जहाल नक्षलवादाला पकडण्यात पोलीस दलाला यश आले आहे अशी माहिती एस.पी.निलोत्पल यांनी पत्रकार परिषद घेऊन दिली.
पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पोलीस मदत केंद्र गट्टा (जांबिया) हद्दीतील मौजा हाच बोडी जंगल परिसरात विशेष अभियान पथकाचे जवान गट्टा (जांभिया) येथील पोलीस पार्टीचे जवान तसेच केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या जवानांनी नक्षलविरोधी अभियान राबवून जहाल नक्षली साधू उर्फ काय उर्फ संजय नरोटे वय ३१ वर्षे, रा.झारेवाडा तहसील एटापल्ली,जिल्हा गडचिरोली यास अटक केली तो सन २०१५ पासून गट्टा दलम मध्ये भरती होऊन सदस्य या पदावर कार्यरत होता. तो नक्षल दल सोडून घरूनच नक्षल दलाच्या विरोधी कारवाया करीत होता.
साधू उर्फ काय उर्फ संजय नरोटे याच्यावर असलेले गुन्हे : -
पोलीस पार्टीवर अंबुश लावणे.जाडपोळ करणे,पोलीस व निष्पाप नागरिकांना जीवे ठार मारणे, दरोडा इत्यादी गंभीर स्वरूपाचे २३ गुन्हे दाखल होते.त्यात बारा चकमक, दोन पोलीस जवानासहित एकूण ८ खून,२ जाळपोळ व एक दरोडा यांचा समावेश होता.
पोलीस गडचिरोली पोलीस दलाने राबवलेल्या प्रभावी नक्षलविरोधी अभियानामुळे जानेवारी २०२२ ते आतापर्यंत एकूण ६७ नक्षलवाद्यांना अटक करण्यात गडचिरोली पोलीस दलास मोठे यश आलेले आहे.पत्रकार परिषदेला पोलीस अधीक्षक निलोत्पल यांच्यासह पोलीस अधीक्षक अभियान अनुज तारे,अप्पर पोलीस अधीक्षक कुमार चिंता,अप्पर पोलीस अधीक्षक अहेरी यतिश देशमुख हे हजर होते.