ब्रम्हपुरी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत काँग्रेस पुरस्कृत पॅनेलची विजयी घोडदौड.
★ 18 पैकी 14 जागांवर काॅंग्रेस पुरस्कृत पॅनलचे उमेदवार विजयी ; आमदार,विजय वडेट्टीवारांची प्रतिष्ठा अबाधित कायम.
अमरदीप लोखंडे!सहसंपादक
ब्रह्मपुरी : दिनांक,२९/०४/२३ ब्रम्हपुरी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या 18 जागांसाठी काल झालेल्या निवडणुकीचा निकाल आज दि. 29 एप्रिल रोजी जाहीर झाला. यामध्ये काॅंग्रेस पुरस्कृत पॅनलचे 14 उमेदवार विजयी झाले आहेत तर भाजप प्रणित पॅनेलचे 4 उमेदवार विजयी झाले आहेत.ब्रम्हपुरी कृषी उत्पन्न बाजार समितीवर मागील काही वर्षांपासून काॅंग्रेस पुरस्कृत पॅनलची सत्ता आहे. त्यामुळे यावर्षी देखील आपली सत्ता कायम राखणे हे काॅंग्रेससाठी प्रतिष्ठेचे होते.
राज्याचे माजी कॅबिनेट मंत्री,आमदार विजय वडेट्टीवार यांच्या नेतृत्वाखाली काॅंग्रेस पुरस्कृत पॅनलने ही निवडणूक लढवली होती. आमदार विजय वडेट्टीवार यांनी अतिशय उत्तम पध्दतीने नियोजन करीत कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत यशश्री खेचून आणत आपल्या नेतृत्वाची झलक पुन्हा एकदा दाखवुन आपली प्रतिष्ठा अबाधित कायम ठेवली आहे. केंद्रात व राज्यात सत्तेवर असलेल्या भाजप पक्षाच्या पुरस्कृत पॅनलला मात्र अवघ्या 4 जागांवर समाधान मानावे लागले आहे.
18 जागांसाठी 39 उमेदवार निवडणूकीच्या रिंगणात उभे आहेत. त्यापैकी इतर मागासवर्गीय गटाच्या जागेवर काॅंग्रेस पुरस्कृत पॅनलचे उमेदवार प्रभाकर सेलोकर हे बिनविरोध निवडून आले होते. त्यामुळे 17 जागांसाठी निवडणुक पार पडली होती.सहकारी संस्था गटातील सर्वसाधारण मतदार संघात काॅंग्रेस प्रणित पॅनेलचे अरुण अलोने, राजेश तलमले, दिवाकर मातेरे, प्रमोद मोटघरे, किशोर राऊत हे विजयी झाले आहेत.
महीला राखीव गटातुन काॅंग्रेस पुरस्कृत पॅनलच्या सौ. सुनिता खेमराज तिडके,सौ.अंजली अनंता उरकुडे ह्या विजयी झाल्या आहेत.विमुक्त जाती/भटक्या जमाती गटातुन काॅंग्रेस पुरस्कृत पॅनलचे ब्रम्हदेव दिघोरे हे विजयी झाले आहेत.ग्रामपंचायत मतदार संघात काॅंग्रेस पुरस्कृत पॅनलचे उमेश धोटे, संजय राऊत,प्रेमानंद मेश्राम,ज्ञानेश्वर झरकर हे विजयी झाले आहेत.व्यापारी व अडते मतदार संघातुन काॅंग्रेस पुरस्कृत पॅनलचे प्रशांत उराडे विजयी झाले आहेत.
काॅंग्रेस पुरस्कृत पॅनलच्या सर्व विजयी उमेदवारांनी आपल्या यशाचे श्रेय राज्याचे माजी कॅबिनेट मंत्री, आमदार विजय वडेट्टीवार, तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खेमराज तिडके, तालुका काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष प्रभाकर सेलोकर, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक दामोधर मिसार, जिल्हा मध्यवर्ती बॅंकेचे उपाध्यक्ष यशवंत दिघोरे, माजी जि.प. सदस्य डॉ राजेश कांबळे, माजी जि.प.सदस्य प्रमोद चिमुरकर, माजी जि.प.सदस्या स्मिताताई पारधी, जिल्हा मध्यवर्ती बॅंकेच्या संचालिका सुचित्रा ठाकरे, माजी सभापती नेताजी मेश्राम, नगरपरिषदेचे गटनेता विलास विखार, शहर काँग्रेसचे अध्यक्ष हितेंद्र राऊत, युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सोनू नाकतोडे, महीला काँग्रेसच्या तालुकाध्यक्ष मंगलाताई लोनबले, महीला काँग्रेसच्या शहराध्यक्षा योगिताताई आमले व काॅंग्रेसच्या सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते यांना दिले आहे.