आंबाडी ग्रामपंचायत च्या पुढाकाराने 15 वर्षाच्या लढाई नंतर शेतकऱ्यांना मिळाला रस्ता.
एस.के.24 तास
भंडारा : नजीकच्या आंबाडी पालगाव गीरोला गट ग्रामपंचायत अंतर्गत भंडारा पाऊनी रस्त्यावर स्थित आंबाडी ते पालगावं दरम्यान शेत शिवारातील शेतकऱ्यांना शेतात कामासाठी एकही रस्ता नव्हता त्यामुळे मागील 15 वर्षापासून शेतकऱ्यांनी ग्रामपंचायत, तहसिलदार, सार्वजानिक बांधकाम विभाग तसेच जिल्हा प्रशासन विभागाला पाठपुरावा केला. अखेर ग्रामपंचायत व तंटामुक्त समिती,पोलिस पाटील यांच्या पुढाकाराने पंधरा वर्षाच्या लढाई नंतर शेतकऱ्यांना रस्ता मिळाल्याने न्याय मिळाल्याचे समाधान व्यक्त केले जात आहे.
आंबाडी ग्रामपंचायत अंतर्गत आंबाडी,गिरोला, भिलेवाडा,माथाडी, सिल्ली, सालेबर्डी शिवधुरा सिमांकन रस्ते तयार केलें मात्र आंबाडी ते पालगावं शिवधुरा सिमांकन रस्ता अपूर्ण होता. त्यामूळे आंबाडी ते पालगावं शेतशिवारातील शेतकऱ्यांना शेतीच्या कामासाठी लोकांच्या शेतमालाचे नुकसान करत कोणाच्याही शेतीतून जावे लागत असे त्यामुळें शेतकर्यांचे आपसी भांडण व्हायचे शिवाय कोणाला शेतात कोणतेही काम उभारताना रस्त्याची समस्या पुढें यायची कोणाला शेती विक्री करण्याची गरज पडल्यास पडल्या भावाने मागितल जायचं म्हणून रस्त्याची मागणी मागील अनेक वर्षांपासून सुरू होती.
आता ग्रामपंचायत सरपंच भजन भोंदे, ग्रामविकास अधिकारी श्याम बिलवणे,माजी तंटामुक्त समिती अध्यक्ष धनराज भुरे, पोलीस पाटील सौ. दुर्गा शेंडे, तंटामुक्त समिती अध्यक्ष प्रा. संजय भुरे, भंडारा पंचायत समिती सदस्य राजेश वंजारी, उपसरपंच गुरुदास बावनकर, पंचायत समिती चे अभियांत्रिकी पॅनल अभियंता वाडीभस्मे,रोजगार सेवक सुधाकर बावनकर ,ग्रामपंचायत सदस्य अमीर बोरकर, मेघा भुरे,पालगावचे पोलिस पाटील भगवान साखरवाडे ग्रामपंचायत कर्मचारी सुखदेव मारबते,शेतकरी दादाराम भुरे, ठाकरे, बावनकर, साखरवाडे, संजू गणवीर,चंदू बावनकर,राहुल बोरकर,निशांत राऊत, अतुल माकडे,कंत्राटदार संतोष हटवार,यांच्या उपस्थितीत रस्ता मोकळा करण्यात आला.