ट्रॅव्हल्स पलटली मारल्याने 14 व्हराडी जखमी.
एस.के.24 तास
सिंदेवाही : पळसगाव (चिखलगाव) नजीक लग्नाच्या वरातीला घेवून जाणाऱ्या ट्रेवल्स चा मागील टायर फुटल्याने झालेल्या अपघातात अंदाजे 14 वराती जखमी झाले. ही घटना रविवार दि.23 एप्रिल च्या संध्याकाळी तीन ते चार वाजता दरम्यान घडली.
लग्नावरून वरात घेऊन येताना टायर फुटल्यामुळे पलटली,10ते 14 प्रवासी किरकोळ जखमी, चिखलगाव जवळील घटना सविस्तर वृत्त असे की.नागभीड तालुक्यातील चिखलगाव जवळ लग्न लागल्यानंतर वरात घेऊन येताना MH-12 K.Q. 0919 या क्रमांकाची ट्रॅव्हल्स पलटी झाली यात जवळपास दहा ते 14 वऱ्हाडी किरकोळ जखमी झाल्याचे समजते.त्यांना उपचारासाठी रुग्णालय येथे तात्काळ दाखल करण्यात आले आहे अशी माहिती मिळाली.