पालांदूर येथील 132 वी भीमजयंती उत्सव उत्सवात संपन्न. ★ दोन दिवसीय कार्यक्रमात विद्यार्थ्यांसह युवक महिला पुरुष हजारो नागरिकांनी घेतला सहभाग.

पालांदूर येथील 132 वी भीमजयंती उत्सव उत्सवात संपन्न.


★  दोन दिवसीय कार्यक्रमात विद्यार्थ्यांसह युवक  महिला पुरुष हजारो नागरिकांनी घेतला सहभाग.


नरेंद्र मेश्राम!जिल्हा प्रतिनिधी


भंडारा : लाखनी तालुक्यातील महत्त्वाचे ठिकाण असलेल्या पालांदूर (चौ. ) येथील त्रिरत्न बुद्ध विहार व समोरील  प्रांगणामध्ये नवयुवक बौद्ध मंडळ , समता सैनिक दल व  जयंती उत्सव कृती समिती  पालांदूर  , कवलेवाडा  , मेंगापूर यांचे  संयुक्त विद्यमाने  शालेय विद्यार्थी  , युवक ,  महिला  , पुरुष आणि हजारो नागरिकांच्या संयोगाने विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३२ वा जयंती उत्सव कार्यक्रम उल्लेखनीय ठरला आहे हे विषेश .

ज्या महामानवाने अहोरात्र कष्ट करून या देशाला समता ,स्वातंत्र्य,बंधुत्व  व  न्याय  ह्या बुद्धाच्या तत्त्वावर आधारित प्रजासत्ताक राज्यघटना देऊन प्रतिनिधी लोकशाही दिली ,  भारतीय संस्कृतीची मूल्य जोपासली व स्वतंत्र भारतात रक्ताचा एकही थेंब न सांडता लोकशाही मार्गाने अनेक सत्तांतरे झाली  , ह्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या उदात्त मूल्याचे आणि विचारांचे स्मरण येणाऱ्या पिढीला व्हावे या कर्तव्य भावनेतून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३२ वी जयंती १३ व १४ एप्रिल २०२३ ला त्रिरत्न बुद्ध विहार पालांदूर/ कवलेवाडा/ मेंगापूर परिसरातील सर्व लोकांच्या सहकार्याने मोठ्या आनंदाने आणि उत्साहाने साजरी करण्यात आली यावेळी दिनांक १३ एप्रिल २०२३ ला सकाळी बुद्ध वंदना व दुपारी १२=०० वाजता पूज्य भंते रत्नसार यांचे मुख्य मार्गदर्शनात महापरित्राण पाठ , धम्म संस्कार शिबिर  , समाज प्रबोधन कार्यक्रम भंते संघानंद व  शेकडो उपासकांच्या उपस्थितीत घेण्यात आले , सायंकाळी ४=०० वाजता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व महापुरुषांच्या साहित्यांचे वाचन आणि भीम बुद्ध गीते गायन करण्यात आले, सायंकाळी ६=०० वाजता सांस्कृतिक कार्यक्रमात शालेय विद्यार्थी  , विद्यार्थीनी  , युवक  , महिला ,  पुरुष यांनी रेकॉर्डिंग ग्रुप डान्स ,  नृत्य  , भाषण , गीत गायन  , अशा अनेक कार्यक्रमांमध्ये सहभागी होऊन आपल्या अंगी असलेल्या सुप्त गुणांना वाव दिली , रात्री ८=०० वाजता महाराष्ट्राच्या कोकिळा व सुप्रसिद्ध गायिका तनुजा नागदिवे यांचे समाज प्रबोधन व कव्वालीचा कार्यक्रम घेण्यात आला दिनांक १४एप्रिल २०२३ ला सकाळी ९=०० वाजता ध्वजारोहण व बुद्ध वंदना आणि सकाळी १०=०० वाजता जयंती जयंती उत्सव रॅलीचे आयोजन करून संपूर्ण गावामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बोधी स्तूपाचे दर्शन घडविण्यात आले ह्यावेळी संपूर्ण गावातील नागरिक उत्साहाने आणि आनंदाने भारावून जयंती उत्सवात सहभाग दर्शवित होते सायंकाळी ४=०० वाजता प्रमुख पाहुण्यांचे मार्गदर्शन कार्यक्रम घेण्यात आले यावेळी कार्यक्रमाचे उद्घाटक माजी जि. प . सदस्या भंडारा  बिंदू  कोचे , कार्यक्रमाचे अध्यक्ष से.नि.शिक्षक व ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ता रमेश गोंडाणे , कार्यक्रमाचे मुख्य मार्गदर्शक माजि प्राचार्य ,  प्रबोधनकार  , कवी  , गीतकार ,  साहित्यिक भंडारा ग्यानचंद ताराचंद जांभुळकर , तसेच प्राचार्य जिल्हा परिषद कनिष्ठ महाविद्यालय पालांदूर प्रा. युवराज दयाराम खोब्रागडे , प्रमुख अतिथी उपसरपंच गट ग्रामपंचायत कवलेवाडा प्रमोद भुते आणि अध्यक्षीय भाषणात रमेश गोंडाने या मान्यवरांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी समाजासाठी आणि देशासाठी दिलेले योगदान याची जाणीव करून दिली व आजची समाजाची दशा आणि दिशा व असंघटित पणा यावर खंत व्यक्त केली , कार्यक्रमाचे संचालन सेवानिवृत्त शिक्षक व ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते एन .व्ही. साखरे , प्रास्ताविक नवयुवक बौद्ध मंडळ अध्यक्ष व ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते दिलीप बडोले , आभार प्रदर्शन नवयुवक बौद्ध मंडळ सचिव व पालांदूर ग्रामपंचायत उपसरपंच पंकज रामटेके यांनी केले सायंकाळी ६=३० वाजता हजारो नागरिकांनी स्नेहभोजनाचा आस्वाद घेऊन संपूर्ण कार्यक्रमाचे उल्लेखनीय समाधान व्यक्त करीत शुभेच्छा आणि अभिनंदनांचा वर्षाव केला संपूर्ण कार्यक्रमाला यशस्वी करण्याकरिता आंबेडकरी चळवळीतील प्रामाणिक संपूर्ण Two-year पदाधिकारी,कार्यकर्ते,युवक,महिला,पुरुष,विद्यार्थी  , विद्यार्थिनी यांनी मोलाचे सहकार्य केले असल्याचे माहिती देताना आयोजकांनी सांगितले आहे .

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !