🙏🙏विनम्र अभिवादन🙏🙏
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी काही ज्ञात असलेल्या नवीन तथ्याविषयी माहिती जाणून घेऊया.
(१४ एप्रिल १८९१—६ डिसेंबर १९५६).
एक थोर भारतीय पुढारी, अस्पृश्यांचे नेते व भारतीय संविधानाचे शिल्पकार.
रत्नागिरी जिल्हात मंडणगडाजवळ असलेले आंबडवे हे त्यांचे मूळ गाव. त्यांचे वडील रामजी सकपाळ हे लष्करात सुभेदार मेजर होते. ते महू येथे असताना आंबेडकरांचा जन्म झाला. आंबेडकर सहा वर्षांचे असतानाच त्यांची आई भीमाबाई मरण पावली. आंबेडकरांचे पुढील सर्व पालनपोषण रामजी व त्यांची बहीण मीराबाई ह्यांनी केले. रामजी लष्करातून निवृत्त झाल्यावर कुटुंबासह नोकरीसाठी साताऱ्यास आले. त्यामुळे आंबेडकरांचे प्राथमिक शिक्षण साताऱ्यास झाले.
आंबेडकरांचे माध्यमिक व विश्वविद्यालयीन शिक्षण मुंबईच्या एल्फिन्स्टन हायस्कूल व कॉलेजमध्ये झाले. या काळात दोन महत्त्वपूर्ण घटना त्यांच्या जीवनात घडल्या. एक म्हणजे त्यांचे रमाबाई ह्या स्वजातीय, म्हणजे महार जातीच्या, मुलीशी लग्न झाले व दुसरी त्यांचे जीवन प्रभावी होण्यास साह्यभूत झालेल्या केळुसकर गुरूंजीशी त्यांचा निकटचा संबंध आला. पदवी घेतल्यानंतर त्यांना बडोदे संस्थानची शिष्यवृत्ती मिळाली व १९१३ मध्ये ते उच्च शिक्षणासाठी अमेरिकेस गेले. तेथील कोलंबिया विद्यापीठातून त्यांनी अर्थशास्त्र विषयात एम.ए. व पीएच. डी. ह्या पदव्या मिळविल्या.
*डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी काही ज्ञात असलेल्या नवीन तथ्ये*
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती १०० पेक्षा जास्त देशात साजरी केली जाते. सन २०१६ मध्ये, त्यांची १२५वी जयंती जगातील १०२ देशांत साजरी करण्यात आली होती.
त्यांची जयंती तीन वेळा (२०१६, १७ व १८) संयुक्त राष्ट्रांत अर्थात United Nations मध्ये साजरी करण्यात आलेली आहे.
छ. शाहु महाराजांनी बाबासाहेबांना "लोकमान्य" ही उपाधी दिली, तर आचार्य अत्रे यांनी बाबासाहेबांना "महात्मा" ही उपाधी दिली.
राष्ट्रीय पुरुषांमध्ये Internet (Google & wikipedia) वर महात्मा गांधी यांच्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनाच सर्वाधिक "search" केले जाते. आणि नंबर तीनवर नेहरू येतात.
त्यांचे मूळ जन्मनाव "भिवा रामजी सकपाळ" असे होते. पुढे ते "भिवा रामजी आंबडवेकर" झाले ('अंबावडेकर' नव्हे),
त्यानंतर "भिवा रामजी आंबेडकर" असे झाले. त्यानंतर "भीमराव रामजी आंबेडकर" असे झाले.
डॉक्टरेट घेतल्यावर "डॉ. भीमराव रामजी आंबेडकर" असे झाले.
समाजिक-राजकीय क्षेत्रात उतरल्यावर १९२७ मध्ये त्याचे नाव "डॉ. बाबासाहेब आंबेडकर" असे झाले; सध्या हेच नाव सर्वात प्रचलित आहे. सध्या त्यांना "डॉ. बाबासाहेब आंबेडकर", "डॉ. बी.आर. आंबेडकर" व "डॉ. भीमराव आंबेडकर" या नावांनी संबोधले जाते.
अर्थशास्त्रामध्ये डॉक्टरेट पदवी मिळविणारे पहिले भारतीय आहेत. तसेच अर्थशास्त्रामध्ये दोनवेळा डॉक्टरेट (पीएचडी व डीएससी) पदव्या मिळविणारे पहिले दक्षिण आशियायी आहेत.
२०१२ झालेल्या "The Greatest Indian" सर्वेक्षणात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना "सर्वात महान भारतीय" किंवा 'सर्वश्रेष्ठ भारतीय' म्हणून घोषित केले गेले आहे. नंबर दोनवर कलाम, तीनवर पटेल, चारवर नेहरू व पाचवर तेरेसा ह्या व्यक्ती होत्या.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना एकूण ११ भाषा येत होत्या. त्यात मराठी, हिंदी, इंग्लिश, जर्मन, फ्रेंच, पारशी, पाली, संस्कृत, बंगाली, कन्नड, व गुजराती.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी ३५ वर्षे (२१ नव्हे) सर्व धर्मांचे तौलनिक व सखोल अध्यनन केलेले आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर त्यांच्या हयातीत भारतातील सर्वात बुद्धिमान व्यक्ती होते.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर त्यांच्या हयातीत भारतातील सर्वाधिक शिकलेले व्यक्ती होते.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर सुमारे विविध भाषांमध्ये १० चित्रपट बनवण्यात आले आहेत; मात्र त्यापैकी एकही हिंदी भाषेत नाही.
प्रजासत्ताक भारताचे निर्माता असलेले डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी कधीही लोकसभेचे सदस्य राहिले नाहीत. त्यांनी दोन वेळेस लोकसभेची निवडणूक लढवली परंतु विरोधी काँग्रेस पक्षाच्या प्रभावामुळे दोन्ही वेळेस ते निवडून येवू शकले नाहीत.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे राज्यसभेचे सदस्य (खासदार) होते.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे मुंबई इलाक्याच्या विधानसभेचे सदस्य (आमदार) होते. तसेच ते विरोधी पक्षनेतेही होते.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे मुंबई इलाक्याच्या विधानपरिषदेचे सदस्य (आमदार) होते.
अर्थशास्त्रामध्ये Nobel मिळवणारे अमर्त्य सेन हे अर्थशास्त्रामध्ये आंबेडकरांना आपले गुरू मानतात.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना वाचनाचा प्रचंड छंद होता. राजगृह मधील त्यांची स्वत:ची लायब्ररी मधे ५० हजारांपेक्षाही जास्त पुस्तके होती. फक्त पुस्तकांसाठी घर बांधणारे ते एकमेव असावेत.
अश्या महामानवास कोटी कोटी वंदन