खाजगी एजन्सी मार्फत नोकर भरतीचा निर्णय रद्द करण्यासाठी परिपत्रकाची होळी - सावलीत युवकांचा आक्रोश.
सुरेश कन्नमवार!मुख्य संपादक
सावली - एजन्सीच्या माध्यमातून नोकर भरती करून कामे करण्यासाठी शासनाने 14 मार्चला निर्णय घेऊन बेरोजगारांची थट्टा केल्याने विरोधात सावलीतील युवकांनी आक्रोश करीत परिपत्रकाची होळी केली. व हा निर्णय रद्द करण्याची मागणी निवेदनाद्वारे मुख्यमंत्री यांचेकडे केली.
महाराष्ट्र शासनाने प्रशासनावरील खर्च आटोक्यात ठेऊन विकास कामे करण्यासाठी बाह्ययंत्रणेमार्फत कामे करण्याचा निर्णय 14 मार्च रोजी घेतला आहे. हा निर्णय बेरोजगारांवर अन्याय करणारा असल्याने युवक व जागरूक नागरिकांनी तहसील कार्यालय सावली येथे त्या शासकीय परिपत्रकाची होळी करीत निषेध केला. नऊ एजन्सी मार्फत कामे केली जात असल्याने आरक्षण व नोकरीची हमी राहणार नाही.
विकास कामाचा कारण देत निर्णय घेतल्याने बेरोजगारांना एजन्सी मार्फत काम करवून घेत वेठबिगारी करायला लावून राज्याचा विकास करणार का ? आमदारांचे पेन्शन,भत्ते देतांना विकास आठवत नाही का? अनावश्यक कामे करतांना विकासाचा दृष्टिकोन कुठे जातो? असे प्रश्न विचारीत मुख्यमंत्री यांना तहसीलदार यांचे मार्फत निवेदन पाठवले.
यावेळी सावलीच्या नगराध्यक्ष लताताई वाळके, उपाध्यक्ष संदीप पुण्यपकार,माजी पंचायत समिती सभापती,विजय कोरेवार,नगरसेवक विजय मुत्यालवार,अनिल गुरनुले,मिथुन बाबनवाडे, कढोली सरपंच,किशोर कारडे,मुन्ना रस्से,प्रीतम गेडाम,अंजली देवगडे,साधना गुरनुले,ज्योती शिंदे, नितीन दुवावार,विरेंद्र गडमवार,निखिल दुधे, आकाश खोब्रागडे,किशोर घोटेकर,प्रवीण संतोषवार,कमलेश गेडाम,प्रतीक तुंगीडवार,बादल गेडाम,आनंद रामटेके,अतुल पेंदाम सह शेकडो उपस्थित होते.