अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघ तालुका शाखा ब्रह्मपुरी ची कार्यकारीणी गठीत.
एस.के.24 तास
ब्रह्मपुरी : (अमरदीप लोखंडे) दिनांक,३०/०३/२३ दिनांक 26 मार्च 2023 ला अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघ तालुका शाखा, ब्रम्हपुरी ची कार्यकारीणी जिल्हा नेते पुरुषोत्तमजी गंधारे,जिल्हा सहसचिव विनोद सातव सर, जिल्हा उपाध्यक्ष रतिराम चौधरी सर यांच्या प्रमुख उपस्थितीत विद्यमान तालुकाध्यक्ष दिलीपजी बावनकर सर, सरचिटणीस टिकेश शिवणकर सर, कार्याध्यक्ष हर्षवर्धन गायधने सर, कोषाध्यक्ष राजेंद्र ठाकरे सर तसेच तालुक्यातील समस्त पदाधिकारी व संघटनेचे सभासद यांच्या प्रमुख उपस्थितीत अध्यक्ष म्हणून श्री नरेश ठक्कर सर तर कार्याध्यक्षपदी श्री,अमोल सडमाके सर, सरचिटणीस श्री गंगाधर पिलारे सर, कोषाध्यक्ष श्री अरविंद राऊत सर, उप सरचिटणीस श्री संजय बट्टे सर वरिष्ठ उपाध्यक्षा ममता चुर्हे मॅडम, उप सरचिटणीस शारदा गहाणे मॅडम या सर्वांची सर्वानुमते पुढील तीन वर्षाकरिता तालुका कार्यकारिणीमध्ये निवड करण्यात आली.
अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघ तालुका शाखा, ब्रम्हपुरी च्या वतीने त्रैवार्षिक अधिवेशन संघभवन ब्रह्मपुरी येथे पार पडले.यामध्ये संघटनेचे सर्व सभासद यांनी सर्व संमतीने या कार्यकारीणीची निवड केली आणि सर्वांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
सर्वांनी भविष्यात संघटनेची होणारी भरभराटीची वाटचाल व्यवस्थितपणे सांभाळावी याकरीता सर्वांनी सज्ज असावं अशी अपेक्षा करून एकमतानेच सर्वांनी कार्यकारिणीची निवड केली.
याप्रसंगी निवड निरीक्षक म्हणून जिल्हा नेते श्री.पुरुषोत्तम गंधारे सर यांनी कार्य पार पाडले.निवड प्रक्रीयेत उषा ढोके मॅडम जिल्हा संयुक्त चिटणीस, श्री दिलिप चंदनबावणे सर अध्यक्ष अखिल शिक्षक संघ नागभीड तालुका श्री क्रिष्णा बहेकार सर कार्याध्यक्ष अखिल शिक्षक संघ नागभीड तालुका यांनी मोलाचे सहकार्य केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक दिलीप बावणकर सर यांनी तर सूत्र संचालन व आभार टिकेश शिवणकर सर यांनी केले.