ने.हि.महाविद्यालयात शहीद दिन कार्यक्रम.
एस.के.24 तास
ब्रह्मपुरी : (अमरदीप लोखंडे) दिनांक,२५/०३/२३ येथील नेवजाबाई हितकारिणी महाविद्यालयातील प्राचार्य कक्षासमोर थोर स्वातंत्र्यसेनानी भगतसिंग, राजगुरू व सुखदेव यांचा स्मृतिदिन हा शहीददिन म्हणून कार्यक्रम घेण्यात आला.
सर्वप्रथम संस्थेचे ज्येष्ठ सदस्य प्रा जी.एन.केला, प्राचार्य डॉ. डी. एच.गहाणे व प्राचार्य डॉ.हर्षा कानफाडे यांनी प्रतिमांना माल्यार्पण करुन कार्यक्रमाची सुरुवात केली.
यानंतर उपस्थित डॉ सुभाष शेकोकर, डॉ राजेंद्र डांगे, डॉ असलम शेख, डॉ धनराज खानोरकर,डॉ रेखा मेश्राम, डॉ रतन मेश्राम, डॉ युवराज मेश्राम,प्रा आनंद भोयर,अधीक्षक संगीता ठाकरे,प्रा मोहूर्ले ,रुपेश चामलाटे,रोशन डांगे व इतरांनी पुष्पांजली वाहून अभिवादन केले.
कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रभारी डॉ कुलजित गिल यांनी केले.यशस्वीतेसाठी डॉ. खानोरकर,डॉ मेश्राम,प्रा विनोद घोरमडे,प्रा आतला,जगदिश गुरनुले,रामटेकेंनी परिश्रम घेतले.