जर सस्पेड झाली तर एकालाही नाही सोडणार." महिला तलाठ्याची उपोषण कर्त्यांना धमकी. महीला तलाठी च्या विरोधात कुरखेडा पोलीसात तक्रार दाखल.

 


जर सस्पेड झाली तर एकालाही नाही सोडणार." महिला तलाठ्याची उपोषण कर्त्यांना धमकी.


★ त्या धमकीने कुरखेडा तालुक्यात उडाली खळबळ.


महीला तलाठी च्या विरोधात कुरखेडा पोलीसात तक्रार दाखल.



एस.के.24 तास


कुरखेडा : कुरखेडा तालुक्यात सुरू असलेल्या अवैध रेती उपसा,तस्करी,विटभट्टी विरोधात कारवाईसाठी उपोषण करणाऱ्यांना महिला तलाठ्याने धमकी दिल्याने एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी उपोषणकर्त्यांनी कुरखेडा पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. मागील वर्षभरापासून जिल्हाभरात मनमर्जी पद्धतीने गौण खनिजाची अवैध तस्करी सुरू आहे.

संभाषणात उपोषण कर्त्याला महीला तलाठ्याने म्हटले आहे की,माझ्या सहीनीशी हस्तलिखीत सातबारा आहे का,मि आता सस्पेंड होण्याचा मार्गावर आहे.मि तुमच्यावर दावा का नको टाकु.मि जर सस्पेंड झाली तर एकालाही नाही सोडणार.आणी मि कशा पध्दतीने कायकाय वाट लावणार हे कोणालाच माहीती नाही.

जिवन जगने मुश्कील होईल तुमच्या लोकांचे. मि स्वता आत्महत्या करणार त्यात गोवणार तुम्ही लोक,मेन्टली हरस करता तुम्ही लोक.मि तिथ घेतल नाही खाणं नाही,घेन नाही काही नाही.आज अधिकारी मि काही न करता सस्पेड करायचे आदेश काढत आहेत.मि माझ्या परिवारा सोबत तुमच्या घरी येऊन आत्महत्या करणार. अशा प्रकारची धमकी दिली. यामुळे उपोषणकर्त्यांमध्ये तसेच कुरखेडा तालुक्यात एकच खळबळ उडाली. त्यांनी या प्रकरणाची पोलिसांत तक्रार केली आहे.

 दोघांतील संभाषणाची ध्वनिफीतदेखील सदर उपोषण कर्त्याकडे असून यात ती महिला तलाठी धमकी देत असल्याचे स्पष्ट ऐकू येत आहे.सदर धमकीची पोलीसात तक्रार दिल्यानंतर कुरखेडा पोलीसांनी अधिनियम भारतीय दंड सहीता १८६० धाराए ५०६ अनन्वे दाखल करून उपोषण तक्रार कर्त्यांना NCR देण्यात येवुन न्यायालयात जावुन दाद मागण्याचे सांगण्यात आल्याचे बोलले जात आहे.सदर उपोषण कर्त्यांना न्याय मिळेल का याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.

अधिकाऱ्यांना सोडून कर्मचाऱ्यांवर कारवाई : - 

जिल्ह्यातील रेती तस्करीचा मुद्दा गंभीर आहे. याविषयी प्रत्येक तालुक्यात ओरड आहे.अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने हे तस्करांची ताकद वाढली आहे.त्यामुळे कारवाईचा जेव्हा प्रश्न येतो तेव्हा लहान कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात येत असल्याने कर्मचाऱ्यांमध्ये असंतोष आहे. यातूनच असे प्रकार घडत असल्याची चर्चा कर्मचारी वर्तुळात आहे.


संदीप पाटील पोलीस निरिक्षक कुरखेडा

माझ्याकडे जसी तक्रार नोंद करण्यात आली त्याच्या आधारे मी कार्यवाही केली आहे. माझ्याकडे सदर तलाठ्याची धमकी दिलेला फोनची आडिओ क्लीप देण्यात आले नाही.


#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !