नवेगाव पांडव येथे सेस फंड योजना अंतर्गत जनावराचा वंध्यत्व तपासणी व उपचार शिबिर आयोजित.



नवेगाव पांडव येथे  सेस फंड योजना अंतर्गत जनावराचा वंध्यत्व तपासणी व उपचार शिबिर आयोजित.



एस.के.24 तास


नागभीड :  दिनांक २३/०३/२०२३ रोज गुरुवार ला मौजा नवेगाव पांडव, तालुका नागभीड, जिल्हा चंद्रपूर येथे पशुसंवर्धन विभाग पंचायत समिती नागभीड व जिल्हा परिषद चंद्रपूर  यांचा संयुक्त विद्यमाने पंचायत समिती सेस फंड योजना अंतर्गत जनावराचा वंध्यत्व तपासणी व उपचार शिबिर आयोजित करण्यात आला असून या शिबिराचे उद्घाटक म्हणून ग्राम पंचायत चे सरपंच अँड. सौ. शर्मिला रतनकुमार रामटेके यांच्या हस्ते रिबीन कट करून उद्घाटन करण्यात आले.त्या उद्घाटन बोलले कि तुमचे पाळीव प्राणी स्वच्छ ठेवा व गेचोडी वैगेरे पासुन सुरक्षित ठेवा काळजी घ्या आणि जर गाई, म्हशी दुध नसतीलच देत तर हार्मोनियम बद्दलेले असु शकतात.

मारल्या ने  दुध देणार नाही एखादीच गाय म्हैस देत  असेल पण त्यांना मायेने अंगावर हात फिरवुन  दुध काढा "दुध जास्त देत नसेल  तर २००ग्राम गुळ एक लिटर पाणी, हिरवी पपई एक कीलो बारीक तुकडे करून शिजवा.व सकाळी आणि संध्याकाळी एक_ एक वाटी तो मिश्रण पाजा ८ दिवस गाय म्हैस भरपुर दुध देणार, डॉ कडून वेळोवेळी तपासणी करून घ्यावी डॉ यांनी सांगितले प्रेमानं काळजी घ्यावी. तसेच अध्यक्ष म्हणून श्री. विजय पंढरीनाथ बोरकुटे माजी.उपसभापती पं स. नागभिड तथा विद्यमान उपसरपंच ग्रामपंचायत नवेगाव. पांडवयांनी बोलले.

मान.सौ.निरंजना शं.सोनटक्के ग्राम पंचायत सदस्य, श्री.मान.रितेश रा. पांडव ग्राम पंचायत सदस्य, तसेच प्रमुख उपस्थित मध्ये सहाय्यक गट विकास अधिकारी श्री.अशोकजी बुराडे साहेब, व पंचायत समितीचे पशुधन विकास अधिकारी डॉ. बी. जी. भलावी साहेब, डॉ.बनाईत प.वि.अ. तलोधी,डाॅ.बागडे, डॉ.मेश्राम,डॉ.गेडाम, डॉ. राऊत, डॉ. दोनाडकर, डॉ. खोब्रागडे, डॉ. वाळवे, डॉ. इनावते, तसेच इतर कर्मचारी वृंद उपस्थित होते.ग्रामपंचायत कर्मचारी श्री.विजय श्रीराम नवघडे,श्री.अतुल दादाजी पांडव व मोठ्या संख्येने गावातील प्रतिष्ठित शेतकरी वर्ग . संचालन डॉ. श्री. भगत गेडाम साहेब यांनी केले तर आभारप्रदर्शन डॉ.बागडे साहेब यांनी केले.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !