प्रेयसीच्या नादी लागून पत्नीला संपविले ; आरोपीला कोर्टाने कारागृहात पाठविले.
एस.के.24 तास
गडचिरोली : विवाहित असतानाही दुसऱ्या युवतीशी प्रेमसंबंध ठेवून आपल्या पत्नीचा दगडाने ठेचून खून केला. त्यानंतर अपघाताचा बनाव करीत त्यापासून बचाव करण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपीला गडचिरोली येथील प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश उदय शुक्ल यांनी जन्मठेप व ५ हजार रुपये दंडाची शिक्षा २० मार्च रोजी सुनावली.
संदीप राजाराम कुमरे (२२, रा.दर्शेवाडा, ता.सिरोंचा) असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे.फिर्यादी कुमारस्वामी नानाजी दुर्गे यांची बहीण सूर्यमाला हिये दर्शवाडा येथील संदीप राजाराम कुमरे यांच्याशी २०१४ मध्ये लग्न झाले.
दरम्यान,संदीप कुमरे याचे कोलपल्ली येथील एका युवतीशी काही महिन्यांपासून प्रेमसंबंध होते.माहेरच्या रेशन कार्डवरून नाव करण्यासाठी कमी अहेरी तहसील कार्यालयात सूर्यमालाला घेऊन जात असल्याची माहिती घटनेच्या दिवशी सकाळी ७:३० वाजता संदीपने कुमारस्वामीला दिली.परंतु त्याच दिवशी दुपारी १ वाजता सोनू झाडे ह्या व्यक्तीने पवाडाच्या पुढील डोंगराच्या चढावर अपघात होऊन सूर्यमाला ही झाल्याची माहिती दिली.
माहिती मिळाल्यानंतर कुमारस्वामी व त्याचा मामा हे घटनास्थळावर पोहोचले. तेव्हा रस्त्याच्या कडेला मोटारसायकल पडून होती तर ५० फूट खोल दरीत रक्तस्राव होऊन सूर्यमाला ही मयत झाली होती. तिचे कपाळ व डोक्यावर मागील बाजूस जखमा दिसून आल्या तर संदीप हा लगतच रक्ताने माखलेल्या स्थितीत जखमी आढळला.संशय बळावल्याने या प्रकरणी रेगुंठा उप पोलिस स्टेशनमध्ये कुमारस्वामी युवतीकडून त्रास दुर्गे यांनी संदीप कुमरे याच्या विरोधात खुनाची तक्रार दाखल केली.
त्यानुसार तपासाअंती आरोपीवर कलम ३०२ भादंवि अन्वये गुन्हा नोंदविला. पोलिसांना आरोपीविरुद्ध सबळ पुरावे मिळाल्याने न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले. फिर्यादी व इतर साक्षीदारांचे बयाण तसेच सरकारी पक्षाचा युक्तिवाद न्यायालयाने ग्राह्य धरून २० मार्च रोजी आरोपी संदीप राजाराम कुमरे याच्याविरोधात जन्मठेप व ५ हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. सरकारी पक्षातर्फे जिल्हा सरकारी वकील एस. यू कुंभारे यांनी काम पाहिले. तर गुन्ह्याचा तपास रेगुंठाचे पोलिस उपनिरिक्षक बाळासाहेब सूर्यवंशी यांनी केले.