२ मेंढ्या व १ बकरी असे तीन नग वाघाच्या हल्ल्यात म्रुत्युमुखी.



२ मेंढ्या व १ बकरी असे तीन नग वाघाच्या हल्ल्यात म्रुत्युमुखी.


नितेश मँकलवार!उपसंपादक


मुल : तिरुपती आपल्या मालकीच्या शेळ्यामेंढ्या घेऊन रात्री येजगाव निवासी नामदेव संभाजी चलाख यांचे भेजगाव शेतशिवारातील शेतसर्वे क्रमांक १०६मधील शेतात मुक्कामी असतानाच रात्री साधारण ११च्या सुमारास अचानक वाघाने शिरकाव करुन हल्ला चढवला व दोन मेंढ्या आणि एका बकरीचा फडशा पाडला .


मूल तालुक्यातील भेजगाव येथील तिरूपति मलया ओनलवार मेंढपाळ यांचे मालकीच्या पशुधनाचे ज्यांत २मेंढ्या व १बकरी असे तीन नग दिनांक २८च्या रात्री वाघाच्या हल्ल्यात म्रुत्युमुखी पडलीत.



शेळ्यामेंढ्यांच्या आवाजामुळे,तिरुपती व इतरांनी आरडाओरडा केल्यामुळे वाघाने पळ काढला. घटनेची माहिती वनविभागाला दिल्यानंतर वनाधिकारी घटनास्थळी दाखल झाले व चौकशी सुरू केली असता वाघाचे पंजे आढळून आले त्यामुळे वाघाच्या उपस्थिती ची खात्री पटली व पंचनामा केला गेला.

वनविभागाचे पोंभुर्णा वनक्षेत्रातील बेंबाळ रेंजमध्ये हे शेतशिवार येत असल्याने याची पुढील चौकशी वनविभाग पोंभुर्णा मार्फत सुरु आहे.


ज्या मेंढपाळाच्या पशुधनाचे नुकसान झाले आहे त्याने अर्ज क्रमांक २०२३/CATLOSS80004/MFD678304 अन्वये वनविभाग पोंभुर्णा कडे आनलाईन अर्ज करून पशुधनाच्या नुकसानीची भरपाई मिळण्यासाठी अर्ज दाखल केला आहे.

या प्रकारामुळे नागरिकांत भितीचे वातावरण असून जनतेने वाघाच्या बंदोबस्ताची मागणी केली असून नुकसान ग्रस्त मेंढपाळाला नुकसान भरपाई तातडीने देण्याची मागणी करण्यात आली आहे.

Tags

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !